Breaking
क्रिडा व मनोरंजन

अबॅकस स्पर्धेत योगिराज तुकाराम बाबा गुरुकुलची यशस्वी भरारी; २९ विद्यार्थ्यांचा गौरव

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व मेडल प्रदान मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा उत्साहात संपन्न

1 4 4 9 9 5

न्यायभूमी 

कोळगाव दिनांक २८ नोव्हेंबर अजिंक्य जगताप

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही गुणवत्ता, बुद्धिमत्ता आणि असामान्य क्षमता दडलेली असते, हे योगिराज तुकाराम बाबा गुरुकुल, खेडलेझुंगे येथील विद्यार्थ्यांनी आपल्या उल्लेखनीय यशातून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

iGenius Abacus स्पर्धेतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या गुरुकुलच्या २९ गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्रे, पारितोषिके व मेडल प्रदान करून गौरव करण्यात आला. या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या यशाला कौतुकाची आणि प्रोत्साहनाची नवी किनार लाभली.

या कार्यक्रमासाठी आय जीनियस अबॅकस च्या संचालिका नीता पवार, संचालक योगेश पवार, अबॅकस लीडर ज्योती शिंदे, अबॅकस शिक्षिका शुभांगी वल्टे, गुरुकुलचे संस्थापक श्री. रविंद्र गोरडे सर, मुख्याध्यापिका योगिता गवळी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक श्री. सोमनाथभाऊ घोटेकर, श्री. माणिक गिते, श्री. नामदेव घोटेकर, श्री. कचेश्वर कोकाटे, श्री. कैलास साबळे, श्री. रविंद्र गिते सर आणि श्री. बाळासाहेब घोटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागतगीताने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा तसेच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

त्यानंतर निवड झालेल्या २९ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व मेडल प्रदान करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला, परंतु त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली नाही, त्यांनाही सहभाग प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले आणि त्यांचा उत्साह वाढवण्यात आला.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कृतिका गुलाब कोकाटे या विद्यार्थिनीने 100 पैकी 100 गणिते 20 मिनिटात सोडवून आपल्या गणितीय कौशल्याची झलक दाखवली.

ओवी नंदकिशोर कोकाटे, मनस्वी अरुण श्रींग, आर्या विकास माळी, तेजस्वी राहुल गिते, अन्वी प्रकाश नागरे, श्रीजित जयदीप गिते, स्वरा गणेश नागरे, रीतिका बाळासाहेब घोटेकर, अजिंक्य महेश पदाडे, अथर्व राजेंद्र रुकारी, यशराज प्रकाश तासकर, श्रेयस रविंद्र गिते, दिव्या अशोक घोडे, मानस्वी गोकुळ नागरे, विहान माणिक निंबाळकर, शिव किरण अडसरे, शिवश्री राहुल घोटेकर, विनया शरद पाटील, प्रज्वल नितीन घुमरे, आयुष बापू आहेर, शिवांश अंताराम शिंदे, ध्रुवी कमलाकर घोटेकर, स्वरा लकी बैरागी, आराध्या विशाल बैरागी, पूर्वी निलेश कोकाटे, भूमिका अमोल डेरले, राजवीर संतोष घोटेकर आणि कृतिका निशांत धोक्रट यांचा समावेश आहे.

याप्रसंगी नीता पवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांची तोंडी व प्रात्यक्षिक गणितीय परीक्षा घेतली. विद्यार्थ्यांनी वेगवान गणनक्षमता, अचूक उत्तरे आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाच्या माध्यमातून आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी गणितासारख्या विषयात मिळवलेले हे यश उपस्थित मान्यवरांसाठी विशेष कौतुकाचा आणि अभिमानाचा विषय ठरले.

या यशस्वी वाटचालीत विद्यार्थ्यांचा नियमित सराव, मेहनत आणि जिद्द यांसोबतच अबॅकस शिक्षिका शुभांगी वल्टे यांचे समर्पित मार्गदर्शन, संस्थेचे प्रोत्साहन आणि पालकांचे मोलाचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना देणाऱ्या अशा उपक्रमांमुळे त्यांच्यात एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास आणि गणितीय कौशल्य विकसित होण्यास मदत होत आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत त्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचा गुरुकुलचा प्रयत्न या यशातून अधोरेखित झाला आहे.

एकाच शैक्षणिक संस्थेतील २९ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झालेली निवड ही गुरुकुलच्या शैक्षणिक वाटचालीतील निश्चितच अभिमानास्पद आणि प्रेरणादायी उपलब्धी ठरली आहे.

या यशाबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षिका यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 4 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे