Breaking
आरोग्य व शिक्षण

विंचूर महाविद्यालयात पोलीस व सैन्य भरती मार्गदर्शन व्याख्यान संपन्न

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 5 3 0 3

न्यायभूमी न्यूज  

विंचूर दि.२१ सप्टेंबर दत्तात्रय दरेकर

गुरुवार दि. 19.09.2024 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इ. 11 वी व इ. 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय सैन्य दलातील निवृत्त सेना अधिकारी श्री. साईनाथ वर्पे सर यांच्या मार्गदर्शनात पोलीस भरती आणि सैन्य भरती पूर्व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले गेले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला गेला. त्यानंतर शिंदे एस. डी. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. माजी सैन्य अधिकारी साईनाथ वर्पे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी केलेले खडतर प्रयत्न तसेच अपेक्षित ध्येय गाठताना कसा संघर्ष करावा लागतो आणि येणाऱ्या अडचणीवर मात करत कसे यश मिळवावे.

याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाच पोलीस भरती, सैन्य भरती, एनसीसी, एनडीए परीक्षा व इतरही राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर टिळेकर आर. टी. यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य देवढे एन. ई. यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास महाडदेव बी. के. निकम एस. व्ही. अहिरे सी. व्ही. गायकवाड एस. पी. व सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बैरागी बी. एम. यांनी तर आभार प्रदर्शन गंधे एस. व्ही. यांनी केले.

2/5 - (3 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 3 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे