Breaking
महाराष्ट्र

विंचूरमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा; विविध ठिकाणी ध्वजारोहण संपन्न

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 9 5

न्यायभूमी

विंचूर दि.२७ जानेवारी सुनील क्षिरसागर 

  विंचूर येथील शासकीय कार्यालये,शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी २०२६) अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला.

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयासह, ग्रामपंचायत आणि पोलीस चौकी येथेही ध्वजारोहणाचे कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.

​कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शानदार सोहळा

येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ कला-विज्ञान महाविद्यालयात मुख्य सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

​रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे विधिवत पूजन करण्यात आले,तर स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन जगदीश (काका) जेऊघाले यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न झाले.

तसेच,सल्लागार समितीचे ज्येष्ठ सदस्य पंढरीनाथ दरेकर यांच्या हस्ते भारत स्काऊट-गाईड ध्वजाचे आरोहन करण्यात आले.

​ध्वजारोहणानंतर विद्यालयाच्या स्काऊट-गाईड पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विद्यालयात विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायत संचलन (Mass Drill) सादर केले ज्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.याप्रसंगी उपस्थितांनी ‘साक्षरतेची शपथ’ ग्रहण केली.

​या कार्यक्रमासाठी विंचूरचे सरपंच सचिन दरेकर, अनिल दरेकर,शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,ग्रामपंचायत सदस्य संतोष जाधव, उपमुख्याध्यापक वाबळे,तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चांदे यांनी केले.

​इतर शासकीय ठिकाणीही ध्वजारोहण उत्साहात

गावातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीही प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला:

​विंचूर पोलीस चौकी: तीन पाटी येथील पोलीस चौकीत पोलीस नाईक संदीप धुमाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी पोलीस कॉन्स्टेबल सागर आरोटे,पोलीस हवालदार भगवान सोनवणे आणि पोलीस कॉन्स्टेबल मानकर उपस्थित होते.

​विंचूर ग्रामपंचायत: ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सरपंच सचिन दरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.यावेळी ग्रामसेवक,सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

​जिल्हा परिषद शाळा: येथील ध्वजारोहण देखील सरपंच सचिन दरेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

​नेहरू चौक: येथील ध्वजारोहण फिरोज मोमीन यांच्या हस्ते करण्यात आले.

​संपूर्ण गावात प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे