ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वतीने कर्मवीर गणपत दादा मोरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय निफाड तालुका निफाड जि नाशिक येथे ग्राहक संरक्षण कायदा ,चळवळ या विषयावर महाविद्यालयीन विदयार्थ्यांना प्रबोधन
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
नासिक दि.२१ डिसेंबर किरण जोशी
ग्राहक पंचायत महाराष्ट्र,नाशिक जिल्हा व मराठा विद्या प्रसारक मंडळ संचलित गणपत दादा मोरे महाविद्यालयांत सयुक्त विद्यमाने ग्राहक संरक्षण व चळवळ यावर विद्यार्थ्यांना प्रबोधनाचा कार्यक्रम दि.१९-१२-२०२५ रोजी पार पडला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना जागरूक ग्राहक बनवणे,हा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व ग्राहक गीताने सादर करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.कोटकर मॅडम यांनी केले.
तसेच प्रमुख वक्ते डॉ संजय पाटील जिल्हाध्यक्ष, ग्राहक पंचायत महाराष्ट्र नाशिक जिल्हा यांनी ग्राहक संरक्षण कायदा,२०१९ (Consumer Protection Act, २०१९ ) मधील महत्त्वाच्या तरतुदी, विदयार्थ्यांचे ग्राहक म्हणून हक्क,कर्तव्ये याची सोप्या भाषेत माहिती देण्यात आली.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र,निफाड तालुका संघटक श्री किरण जोशी यांनी ऑनलाइन व्यवहारामुळे विद्यार्थ्यांना होणारे तोटे,घ्यावयाची काळजी, तसेच ग्राहक संरक्षण सुधारित कायदा २०१९ नुसार ग्राहकांना तक्रार नोंदवण्याची इ दाखील या ऑनलाइन पोर्टलची माहिती व उपयोग कसा करावा,या संदर्भातील सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एन शिंदे यांनी कायदा २०१९ हा भारतातील ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी एक महत्त्वाचा कायदा आहे.
ग्राहकांना त्यांच्या हक्काबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी,तक्रारीचे निराकरण करण्यासाठी एक मजबूत प्रणाली आहे,असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे डॉ संजय पाटील,डॉ राजेंद्र बागुल,श्री वसंत दंडवते,श्री विजय पाटील,श्री प्रकाश जोशी,श्री संदीप नगरकर सौ.इंदिरा बागुल,सौ.सीमा डेर्ले व महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.शेलार याचे मोलाचे सहकार्य लाभले.



