अमली पदार्थ व डॉक्टरांच्या सुरक्षिततेबाबत डॉक्टर्स असोसिएशनची कैफियत; स.पो.नि. सागर कोते यांची सकारात्मक भूमिका
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
नाशिक जिल्हा (लासलगाव )दि.१५ जुलै कैलास उपाध्ये
लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने लासलगाव व परिसरात वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या समस्येसह डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा लासलगावचे स.पो.नि.सागर कोते यांच्यासमोर मांडला.
यावेळी विविध समस्यांवर सविस्तर चर्चा होऊन प्रभावी उपाययोजना राबविण्याबाबत सकारात्मक विचार विनिमय झाला.
डॉ.स्वप्नील जैन यांनी सागर कोते यांचे स्वागत करत डॉक्टर व पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक दृढ होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
बैठकीत लासलगाव परिसरात अमली पदार्थांचे वाढते प्रमाण,त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्या तसेच डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या घटनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. वैद्यकीय व्यावसायिकांना सुरक्षित वातावरण मिळावे.
तसेच अशा घटनांवर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे,अशी अपेक्षा असोसिएशनने व्यक्त केली.
यावर सागर कोते यांनी डॉक्टरांच्या भावना जाणून घेत त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल,अशी ग्वाही दिली.
बैठकीस लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ.कैलास पाटील,डॉ.सुरेश दरेकर,डॉ.विजय केंगे,डॉ.विलास कांगणे,डॉ.अनिल बोराडे,डॉ. प्रणव माठा,डॉ.संगीता सुरसे आदी उपस्थित होते.


