Breaking
महाराष्ट्र

निफाड तालुक्यात’शिवरस्ते’मोजणीचा ऐतिहासिक उच्चांक; एकाच दिवसात ७ रस्त्यांचे मोजमाप पूर्ण

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 2 0 8 8

न्यायभूमी 

​ विंचूर (नाशिक) :  दि.०५ सुनील क्षिरसागर

निफाड निफाड तालुक्यात प्रशासकीय गतिमानता आणि शेतकरी चळवळीच्या समन्वयातून आज एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

महसूल आणि भूमी अभिलेख विभागाच्या संयुक्त विद्यमाने एकाच दिवसात तब्बल ७ गाव नकाशांवरील शिवरस्त्यांची मोजणी पूर्ण करण्यात आली असून,यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागणार आहेत.

​उपविभागीय अधिकारी डॉ.मंगरुळे,तहसीलदार नाईकवाडे आणि भूमी अभिलेख उपअधीक्षक भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली.

‘महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेत रस्ते चळवळ कृती समिती’च्या पाठपुराव्याला या मोहिमेमुळे मोठे यश मिळाले आहे.

​मोजणी झालेले प्रमुख रस्ते व ठिकाणे:

​१) म्हाळसाकोरे: येथील भेंडाळी-वाळके वस्ती व ढोबळे वस्ती रस्त्याची मोजणी निमतानदार शशिकांत बैरागी व कुलकर्णी मॅडम (ग्राम महसूल अधिकारी) यांच्या उपस्थितीत झाली.

२) धारणगाव वीर – धारणगाव खडक: या शिवरस्त्यासाठी प्रतीक हजारे व गायकवाड मॅडम यांनी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने मोजणी पूर्ण केली.

३) उंबरखेड – पिंपळगाव: भुकरमापक शैलेशसिंग राजपूत व मंडळ अधिकारी बोडके साहेब यांच्या उपस्थितीत या रस्त्याचे मोजमाप झाले.

) भुसे – करजगाव: येथे अभिलेखापाल प्रदीप कुटे यांनी रस्त्याची एक बाजू मोजून पूर्ण केली.

५) दारणा सांगवी – शिंपी टाकळी: रुपेश पाटील (भुकरमापक) यांनी या मार्गाची मोजणी यशस्वीरीत्या पूर्ण केली.

६) दत्त मंदिर (दारणा सांगवी) ते डोंगरवाडी हिंगणवेढे: तनय विसपुते यांनी या रस्त्याच्या अर्ध्या भागाची मोजणी पूर्ण केली.

७) दारणा सांगवी (म्हसोबा वाट ते सावळीवाट): या रस्त्यासाठी कांतीलाल बोडके यांनी विशेष परिश्रम घेतले.

​प्रशासन आणि शेतकरी यांचा समन्वय

​या मोहिमेत मंडळ अधिकारी घाडगे, भारस्कर शिरस्तेदार, आणि विविध गावांचे ग्राम महसूल अधिकारी, पंचायत अधिकारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

मोजणीच्या वेळी कृष्णा मुरकुटे, सुभाष जाधव,विष्णू पुंड,भाऊसाहेब अहिरे यांसह अनेक लगतचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​”निफाड तालुक्यात एकाच दिवसात सात रस्त्यांची मोजणी होणे हा एक उच्चांक आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यांचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. या मोहिमेत सहभागी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि शेतकऱ्यांचे आम्ही आभार मानतो.”

— विजय दरेकर (सदस्य, शिव पाणंद शेत रस्ते चळवळ कृती समिती)

​या यशस्वी मोहिमेबद्दल कृती समितीचे योगेश अडसरे,सुरेश वाटपाडे,दशरथ शिंदे,नवनाथ सालगुडे,गणेश जाधव आदींनी प्रशासनाचे कौतुक केले आहे.

या मोहिमेमुळे तालुक्यातील इतरही प्रलंबित रस्त्यांच्या कामांना गती मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे