कन्या पूजन व माता मेळाव्यात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
नवरात्र उत्सवानिमित्त योगेश्वर विद्यालय दावचवाडी येथे उपक्रमांचे आयोजन
न्यायभूमी : दि.२ ऑक्टोंबर विंचूर (नाशिक) सुनील क्षिरसागर
नवरात्रोत्सवानिमित्त दावचवाडी येथील योगेश्वर विद्यालयात कन्या पूजन व माता मेळाव्याचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला परिसरातील मातांचा व महिला वर्गाचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिशुविहार वर्गातील लहान मुलींनी देवीच्या नऊ रूपांची वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या कन्यांना देवीचे स्वरूप मानून त्यांची पूजा, अक्षता,फुले,प्रसाद व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
माता मेळाव्याच्या कार्यक्रमात विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक सुनील मोगल यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शितल देवरे यांनी सखी सावित्री या उपक्रमाविषयी तर वैशाली गवळी यांनी विद्यार्थी सुरक्षा व ताण-तणाव व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन केले.
संवादात्मक चर्चेत मातांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यानंतर हार्दिक कुंकवाचा कार्यक्रमही पार पडला.
या उपक्रमाचे सर्व उपस्थित माता-भगिनींनी व न्यायमूर्ती रानडे विद्या प्रसारक संस्थेच्या विश्वस्त मंडळाने कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभारी मुख्याध्यापक सुनील मोगल यांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी संतोष बि-हाडे,मीना वाघ, रूपाली मते,वैशाली गवळी,सविता मगर,शितल देवरे,सीमा मैंद,अनुजा वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते


