विचूर येथील सरपंच सचिन दरेकर यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना फराळ व कपडे देऊन केला सन्मान
न्याय भूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
विंचूर दि.२५ ऑक्टोंबर सुनील क्षीरसागर
दिवाळीच्या सणानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विंचूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सचिन दरेकर व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभागातील सर्व सफाई कामगार,मुकदम तसेच ड्रायव्हर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या वेळी कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळाचे विविध पदार्थ,नवीन कपडे तसेच महिलांना साड्या देऊन सन्मान करण्यात आला.
दरेकर कुटुंबाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही परंपरा कायम ठेवत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली.
सत्कार कार्यक्रमात रत्नाकर दरेकर,ज्ञानेश्वर दरेकर,शैलेश दरेकर,ज्योती दरेकर,माधुरी दरेकर व सोनाली दरेकर यांची उपस्थिती होती.
दरेकर परिवाराच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी व ग्रामस्थांनी मनःपूर्वक कौतुक केले.
सचिन दरेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की,“ग्रामपंचायतीतील आरोग्य विभागातील कर्मचारी हे गावाच्या स्वच्छतेचे खरे शिल्पकार आहेत.

त्यांच्या परिश्रमामुळेच आपलं गाव स्वच्छ आणि आरोग्यदायी राहतं.त्यामुळे त्यांच्या सन्मानासाठी हा छोटासा प्रयत्न आहे,”असे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमामुळे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलले असून गावात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.



