Breaking
नोकरी

लासलगाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक निरीक्षक पदी सागर कोते

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

1 0 6 2 7 5

न्यायभूमी 

नाशिक जिल्हा ( लासलगाव ) दि.१५ जुलै कैलास उपाध्ये

 लासलगाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर सागर कोते यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या कोते यांची येवला,वावी,लासलगाव येथे बदली झाली असून त्यांच्या आगमनाने स्थानिक गुन्हेगारीवर वचक निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 सागर कोते यांनी यापूर्वी येवला,वावी येथे प्रभावीपणे काम केले आहे तेथील कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच विविध गुन्ह्याची उकल करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे त्यांच्या या अनुभवाचा फायदा लासलगाव परिसरातील शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी होणार आहे.

पोलीस स्टेशनमध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी सहकार्याकडून परिसराची भौगोलिक व गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती घेतली परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षिततेची भावना देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट राहील असे त्यांनी यावेळी सांगितले लासलगाव परिसरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस प्रशासनातील कर्मचारी नेत्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

4/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 6 2 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे