Breaking
क्रिडा व मनोरंजन

के.के.वाघ च्या विद्यार्थिनींची राज्य स्तराला गवसणी

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 8 8

न्यायभूमी न्यूज 

कोटमगाव दि २४ जानेवारी प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर 

     के. के. वाघ जुनिअर कॉलेज काकासाहेबनगर रानवड येथील इयत्ता अकरावीच्या विद्यार्थिनींनी नुकत्याच *जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार* येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश मिळवत राज्यस्तराला गवसणी घातली.

सन 2024 – 25 या वर्षातील शासन आयोजित, *नाशिक विभाग स्तर शालेय टेनिस क्रिकेट क्रीडा स्पर्धांचे* आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा ही 19 वर्ष आतील मुला-मुलींसाठी आयोजित करण्यात आली होती.

सदर स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत धुळे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट क्रीडा स्पर्धेत आपल्या संघाची नोंद केली.

सानिका गोराणे हिने संघाचे नेतृत्व केले तर, संस्कृती घंगाळे, पायल गारे, संस्कृती चव्हाण, वैष्णवी पडोळ, स्नेहल शिंदे, वैष्णवी जाधव, तनुजा पवार, प्रांजल गारे, तनुष्का शिंदे, अपेक्षा जाधव, दिव्या राजोळे, त्रिवेणी राजोळे, पायल पडोळ, समृद्धी रायते, इत्यादी खेळाडूंनी संघ विजयासाठी योगदान दिले.

     संघाने मिळवलेल्या यशाबद्दल के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री समीर दादा वाघ यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. भूषण कर्डिले यांनी विद्यार्थिनींचे विशेष कौतुक करत आजची स्त्री सर्व सक्षम असल्याचे नमूद केले.

के के वाघ जुनिअर कॉलेजचे प्राचार्य, मा. शरद कदम यांनी संघाने केलेल्या कामगिरीबद्दल अभिनंदन करत सर्व खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक श्री प्रदीप राठोड व आकाश अहिरे यांचेही अभिनंदन केले.

स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य, स्कूल कमिटी सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडूनही विद्यार्थ्यांवर अभिनंदनचा वर्षाव झाला व पुढील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे