Breaking
गुन्हेगारी

लासलगाव पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर रॉबरी 

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

1 1 3 1 3 4

न्यायभूमी 

 लासलगाव प्रतिनिधी दि.३० जुलै कैलास उपाध्ये

लासलगाव मध्ये चोरीच्या घटनांनी गाठला कळस गेल्या सहा महिन्यांमध्ये जवळजवळ लासलगाव मधील सर्व मंदिरांमध्ये चोरीची घटना घडली आहे परंतु अध्याप एकही चोरीच्या घटनेचा उलगडा झालेला नसल्याने लासलगाव मधील नागरिकांचा हिरमोड होत आहे.

कांदा व्यापारी ऑफिस तसेच लासलगाव येथील मोठमोठ्या मंदिरात, दुकानात चोऱ्या होत असल्याने लासलगाव येथिल नागरिकांमध्ये नाराजीचा सूर वाढत चालला आहे.

लासलगाव पोलिसांना चोर उघड उघड आवाहन देत आहे. दरम्यान भरवस फाटा येथील शेतकरी लासलगाव येथे किराणा माल खरेदी करून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर असलेल्या दुकानात गेले असता वॅगन आर कार पार्किंग मध्ये उभी असता अज्ञात व्यक्तीने गाडीची मागील काच फोडून 70000 rs चोरल्याची घटनेने लासलगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

लासलगाव पोलिसांनी लवकरच ह्या बाबतीकडे लक्ष द्यावे अशी मागणी लासलगाव येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

2/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 3 1 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे