न्यायभूमी न्यूज
लासलगाव दि १६ ऑक्टोंबर
लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती आणि वाचन प्रेरणा दिन संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ग्रंथालय विभागातर्फे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
‘पुस्तकांच्या वाचनाने व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर काकासाहेबनगर येथील कला, वाणिज्य व संगणक विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाचे डॉ.अरुण ठोके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.दत्तात्रय घोटेकर, पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, ग्रंथपाल प्रा.गुरुदेव गांगुर्डे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाअधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.उज्वला शेळके, प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे, डॉ.मारोती कंधारे, प्रा.वाल्मीक आरोटे, प्रा.सौरभ तिपायले प्रा.मनोहर मोरे, प्रा.दत्तात्रय गायकवाड इ. उपस्थित होते.
प्रा.गुरुदेव गांगुर्डे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर श्रीराम वारुळे या विद्यार्थ्याने कार्यक्रमाचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रंथपाल प्रा.गुरुदेव गांगुर्डे, रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.