न्यायभूमी न्यूज
ओझर दि २२ डिसेंबर प्रतिनिधी / उत्तम गारे
ओझर येथील ‘मविप्र’ संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयात राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापिका सुनीता नलावडे सर्व गणित शिक्षकांच्या हस्ते झाले.
मानवी जीवनात गणिताचे स्थान लक्षात घेता श्रीनिवास रामानुजन यांचे गणितीय कर्तुत्वाचे स्मरण व्हावे म्हणून गणितदिन साजरा केला जातो असे असे शिक्षक नरेंद्र डेरले यांनी प्रास्ताविकात सांगितले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते.
यानिमित्त विविध स्पर्धेत अर्जुन संदीप मोरे भित्तिपत्रक, स्क्वेअर नंबर मॉडेल, सिद्धार्थ अजित गायकवाड क्विज बोर्ड मॉडेल, गणितीय पोस्टर्स रांगोळी प्रदर्शन तसेच तयार केलेल्या साहित्याचे अनावरण मुख्याध्यापक सोपान वाटपाडे, उपमुख्याध्यापिका सुनीता नलावडे यांनी केले.
प्रियंका दीपक खैरनार श्रीनिवास रामानुजन, तर सृष्टी दीपक काळे हिने डी आर कापरेकर यांच्या जीवन कार्यावर भाषणे केली. गणिती उखाणे विद्या प्रताप ढालवाले, साक्षी देवराज जाधव यांनी सादर केले. गणितदिन साजरा करण्याचे उद्देश व कार्य गणितीय संकल्पना, त्रिकोणमिती शिक्षिका संगीता शेटे यांनी स्पष्ट केल्या.
गणितीय मॉडेलबद्दल आत्माराम शिंदे बाबासाहेब गायकवाड वनिता अहिरे उज्वला कदम नरेंद्र डेरले मंगल सावंत सरोज खालकर संगीता भदाणे वनिता शिंदे मोहिनी चौधरी राजश्री मोहन सोनल माळोदे वैशाली कातकाडे ज्योती पाटील सरिता घुमरे सुप्रिया भंडारे यांनी थोडक्यात माहिती दिली.फलक रेखाटन कलाशिक्षिका मोनाली निकम यांनी केले.
अध्यक्ष व मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी गणितीय पाढे सूत्र संकल्पनांचा नियमित अभ्यास करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. सूत्रसंचालन संगीता शेटे यांनी केले.