Breaking
गुन्हेगारी

रुई येथे मारहाणीत एकाचा मृत्यू सविस्तर वृत्त

अप्पर पोलीस अधीक्षकांची घटनास्थळाला भेट

0 1 5 5 8 7

न्यायभूमी न्यूज 

लासलगांव दि २५ नोव्हेंबर 

 ‘समाज मंदिराजवळ का थुंकले’ अशी विचारणा केल्याचा राग येऊन रुई ता.निफाड येथील तीन आरोपींनी विकास शांताराम दुशिंग यांस लाथा बुक्क्याने मारहाण केली.

या मारहाणीत जबर जखमी झालेल्या दुशिंग यांचा काल जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असतांना मृत्य झाला आहे.

या प्रकरणी तीन आरोपींवर लासलगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे.

    गणेश दशरथ केदारे वय-२५, व्यवसाय चालक रा.वाघदर्डी ता.चांदवड यांनी दिलेल्या फिर्यादीत, फिर्यादीचे मयत मामा विकास शांताराम दुशिंग, वय ३८ व आरोपी रुई ता.निफाड या एकाच गावचे रहिवाशी आहेत.

दि.२० नोव्हे. सायं ६.३० वाजेच्या दरम्यान आरोपी हे गोदावरी डावा कालव्या लगतच्या समाज मंदिराजवळ गुटखा खावुन थुंकले. त्यावेळी तेथे हजर असलेले फिर्यादीचे मयत मामा विकास दुशिंग हे आरोपीतांना, ‘तुम्ही समाज मंदिराजवळ का थुंकले’ असे बोलला.

त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा आरोपींना राग येवुन आरोपी अजय भिमा बर्डे, वय-२१, रोहन रमेश माळी, वय-२०, समाधान संजय पवार वय-२१ सर्व.रा. रुई यांनी फिर्यादीचे मयत मामास वाईटसाईट शिवीगाळ करुन आरोपी अजय भिमा बर्डे याने फिर्यादीचे मयत मामास हाताचापटीने गालावर मारहाण केली.

तसेच आरोपी रोहन रमेश माळी व समाधान संजय पवार यांनी फिर्यादीच्या मयत मामास जमिनीवर खाली पाडुन छातीवर पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून व त्यास, ‘तू पुन्हा आमचे नादी लागला तर तुला मारुन टाकु’ असा दम देवुन तेथुन निघुन गेले.

सदर मारहाणीत मयतास छातीस व पोटास गंभीर दुखापती झाल्याने त्याचेवर सिव्हील हॉस्पिटल नाशिक येथे उपचार चालु असतांना तो दि.२४ नोव्हें रोजी पहाटे ४.३२ वाजता मयत झाला.

या फिर्यादीवरून आरोपींच्या विरोधात गु.रजि.नं.३०३ /२०२४ भा.न्या.सं.२०२(३) चे कलम १०३,११८(१), ११५(२), ३५२,३५१(२)(३),३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 लासलगाव पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केली,असून न्यायालयाने आरोपींना दि.२८ नोव्हेंबर पावेतो पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदर घटनेचे गांभीर्य पाहता अप्पर पोलीस अधीक्षक मा.आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ.श्री.निलेश पालवे यांनी भेट दिली आहे.

अधिक तपास स.पो.नि बी.जे.शिंदे करत आहेत.

4.7/5 - (3 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 5 8 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे