Breaking
गुन्हेगारी

विंचूर च्या जागरूक पत्रकाराने तोतया अधिकाऱ्याचा डाव हाणून पाडला लाखो रुपयांची फसणूक टळली

Nyaybhumi news

0 1 5 5 8 8

न्यायभूमी न्यूज 

विंचूर दि ०३ ऑक्टोंबर  दत्तात्रय दरेकर

प्रकाश जगन्नाथ ठोंबरे राहणार वडझिरे तालुका सिन्नर हा व्यक्ति विंचूर मधे येऊन नागरिकांना मी मंत्रालयातुन आल्याचे सांगुन, सुशिक्षित बेरोजगार यांना कर्ज उपलब्ध करून देतो त्याने असे सांगितल्यावर साधारण ५० ते ६० लोक गोळा झाले. आणि प्रत्येक व्यक्ती कडून ७८४० रुपये घेणार होता.

५ लाख ते २५ लाखांपर्यंत आणि त्या वर सबसिडी ३५ ते ५५ टक्के मिळवून देतो असे सांगून सर्वांना विश्वासात घेतले.

त्यावेळेस विंचूर येथील पत्रकार सुनील क्षिरसागर यांना या शिबिरात आमंत्रित करण्यात आले होते.

त्यांनी त्या तोतया मंत्रालयातील व्यक्तीला विचारणा केली असता तो त्यांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर देईना त्याच्याकडे मंत्रालयातून आल्याचा कोणताही पुरावा नव्हता आणि तो लोन देण्याआधी पैसे मागत होता त्याच्याकडे एक जुना फोन तो सॅटेलाईट असे सांगत होता.

विंचूर येथील पंढरीनाथ थोरे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद हे माझ्या चांगले ओळखीचे आहे ते मला ओळखतात असे तो आपले पुरावे सांगत होता.

हा त्याचा बराचसा बेतालपणा पत्रकाराच्या लक्षात आल्यानंतर क्षिरसागर यांनी पंढरीनाथ थोरे यांना फोन केला असता, ते म्हणाले अशा मंत्रालयातील ठोंबरे नामक व्यक्तीला मी ओळखत नाही तुम्ही पत्रकार आहात त्याचा व्हिडिओ काढून त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या.

त्यानंतर प्रहार संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष जयेश जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मंत्रालयातील नंबर दिला.

त्यावर मंत्रालयात या ठोंबरे नामक व्यक्तीची चौकशी केली असता या नावाचा मंत्रालयात सदर व्यक्ती असा कोणी नाही.

मग पूर्ण खात्री झाल्याने, लासलगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता साहेबांच्या तत्परतेने सापळा लावण्यात आला.

सुनिता शिंदे यांच्या घरी त्याला कुठलाही पत्ता लागून न देता. यांनी त्याला फोन करून सांगितले की, लोण लाभार्थी आलेले आहे, साहेब तुम्ही लवकर या सांगत होते.

 दुपारी दोन वाजता तो सुनीता शिंदे यांच्या घरी आला तोपर्यंत पत्रकार सुनील क्षीरसागर व पोलीस रामदास घुमरे सुनीता शिंदेंच्या घरी त्याची वाट बघत होते. त्याची चौकशी केली असता, तो काही सांगत नव्हता.

खुप चालाखी करत होता. घुमरे पोलीसांनाही हुलकावणी देत होता. मी मंत्रालयातून आलो आहे वगैरे-वगैरे. त्यानंतर त्याला लासलगाव पोलीस स्टेशन ला नेण्यात आले त्याची पूर्ण चौकशी केली असता त्याच्यावर पहिलेच २ गुन्हे दाखल होते.

 त्याचा सर्व प्रकार लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे,उपपोलिस निरीक्षक आप्पासाहेब हंडाळ, पोलिस हवालदार संदिप निचळ, शशिकांत निकम, सागर आरोटे, रामदास घूमरे यांच्या लक्षात आल्यानंतर भारतीय न्यायसंहिताप्रमाणे 204,319(2) कलमांतर्गत त्या तोतया अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 5 8 8

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे