विंचूर येथे दत्त जयंती निमित्त श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुचरित्र पारायणाची सांगता
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
न्यायभूमी : दि १६ डिसेंबर
प्रतिनिधी सुनील क्षिरसागर
विंचूर(नाशिक) : नाशिक जिल्ह्यातिल विंचूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात श्रीगुरु दत्त महाराजांच्या जयंती निमित्त अखंड नामजप, यज्ञ स्वाहाकार, गुरुचरित्र पारायण, पहरे आदी सेवा संपन्न झाली आहे.
श्री दत्त जयंती उत्सव अखंड नाम याग श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह आठ डिसेंबर रोजी ग्रामदेवतेचा सन्मान व मंडल मांडणीने प्रारंभ झाला. सोमवारी मंडल स्थापना स्थापित देवता हवन झाले.
दहा डिसेंबरला नित्यस्वाहाकारासह गणेश आणि मनोबोध याग झाला. मंडळ स्थापना स्थापित देवता हवन झाले. दहा डिसेंबरला नित्यस्वाहाकारासह गणेश याग आणि मनोबोध याग झाला. शुक्रवार दिनांक तेरा नित्य स्वाहाकार चंडीयाग पार पडला.
शनिवार दिनांक चौदा रोजी नित्य स्वाहाकार रुद्र याग, मल्हारी याग तसेच सायंकाळी सामुदायिक दिवट्या काढण्यात आल्या.
त्यात तीनशे सेवेकरी यांनी सेवेत भाग घेऊन गावचे विंचुरकर जहागीरदाराने बांधलेले श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिरात जाऊन पाच पावले करून परत महाराजांच्या दरबारात महाराजांना ओवाळून, देव नाचून, भंडारा उधळून, खंडोबाची व देवीची आरती करून सांगता झाली.
दिनांक पंधरा रविवार नित्य स्वाहाकार बली पूर्णाहुती दु.१२:३९ वाजता श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
दिनांक सोळा सोमवार रोजी श्री सत्यदत्त पुजन, देवता विसर्जनाने अखंड नाम जप, यज्ञ, सप्ताहाची सांगता होऊन भाविक सेवेकरी यांनी महाप्रसाद घेतला.
यावेळी हितगुजातुन सुभाष रनाळकर (नाशिक) सांगतात सध्या मुला- मुलींचे विवाह जमवणे खूप अवघड झाले असून, त्यासाठी अण्णासाहेबांनी श्री स्वामी समर्थ प्रत्येक केंद्रात व स्वामींच्या मेळाव्यात विवाह संस्कार या विभागातून सेवेकऱ्यांना विवाह विषयी फॉर्म भरून, नोंदणी करून, लग्न जमवले जाते, विनामूल्य विवाह सामुदायिक पद्धतीने या केंद्रामार्फत केले जाते.
याबद्दल यांनी आपल्या मोबाईलवर विवाह नोंदणी बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मोबाईलवर दिली जाते. ज्यांना समजले नसेल त्यांनी आपआपल्या केंद्रात जाऊन आमच्याशी मोबाईलवर संपर्क साधावा.
तसेच मेघा नागरे (विवाह विभाग नाशिक जिल्हाप्रमुख) यांनी आपल्या वित्तगुजातून गुरुचरित्र पारायण आपण का करतो ? याबद्दल सेवेकऱ्यांसोबत प्रश्न- उत्तर यासंदर्भातून चर्चा करून, सोळा संस्कार या विषयातून मुलींनी जीन्स पॅन्ट किंवा मुलांचा पोशाख घालूनये, त्यांच्या भविष्यात पुढे संतती होण्यास किती प्रॉब्लेम येतात, गुरुचरित्र वाचन करताना सात दिवस नियम का पाळावे ?
स्वयंपाक करताना स्त्रियांनी टीव्ही बघत किंवा चप्पल घालून स्वयंपाक करू नये, अशा अनेक विषयावर कुलदेवतेचे मानसन्मान, कुलदेवतेची सेवा तसेच त्या पुढे असे म्हणतात की, आपल्या या जीवनात आपण अडचणीत का येतो? याबद्दल विविध प्रश्नांची निरसन दिंडोरी दरबारात माऊलींकडून आपल्या प्रश्नांची निरसन केले जाते.
त्यावर माऊली आपल्याला सेवा देतात ती आपण मनोभावेने केली तर, आपण नक्कीच आपल्या संकटातून बाहेर येतो. आपण समाजाचे, देवाचे काही देणे लागतो म्हणून, स्वामींचीच्या दरबारात जाऊन आपली सेवा केंद्रात रुजवली पाहिजे. आपल्याला रोज नाही जमले तर आठवड्यातून, महिन्यातून एक दिवस तरी सेवा रुजू करावी.
त्यांनी गर्भ संस्कार विभागापासून ते विवाह संस्कार विभागापर्यंत संपूर्ण माहिती दिली. विवाह स्थळाबद्दल सेविकाऱ्यांनी आधार कार्ड, फोटो, सर्व माहिती कम्प्युटरला द्या नंतर आपल्याला आयडी पासवर्ड दिला जातो आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती विवाह स्थळाबद्दल दिली जाते.
कालच गुरुमाऊलींनी विवाह संस्कार बद्दल नवीन ॲप लॉन्च केला आहे. सध्या घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढत असून, याचे कारण एकत्रित कुटुंब पद्धती राहिल्या नाही.
मुलांवर संस्कार होत नाही, मुलींच्या या संस्कारा अभावामुळे घटस्फोटा पर्यंत जाऊन पुढे संबंधच तुटले जातात.
अश्या अनेक विषयांवर नागरे यांनी सेवेकरांना मार्गदर्शन पर हितगुज केले.