विंचूर येथे चंपाषष्ठी निमित्त बारागाड्या सण मोठा उत्साहात साजरा
गावातील शोभा यात्रेने जणू "सोन्याचे विंचूर" असे चित्र
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि ०९ डिसेंबर
चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते.
मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून चंपाषष्ठी हा उत्सव करतात.
विंचूरचा प्रसिद्ध उत्सव म्हटले की डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते म्हणजे चंपाषष्ठी मधे ओढल्या जाणाऱ्या बारागाड्या विंचूर परिसरारातुन तसेच लांब-लांबून भाविक बारागाड्या बघण्यासाठी येत असतात.
परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून कोरोना सारख्या महामारीने सर्वत्र थैमान घातल्याने याचा परिणाम सर्वच सण-उत्सवार झाला. परंतु ह्यावर्षी मोठ्या उत्साहात बारागाड्या ओढ़ल्या गेल्या सर्वात महत्वाच म्हणजे या मधे तरुण पीढ़ीने मोठ्या उत्साहाने या मधे सहभाग घेऊन सर्व नियोजन यशस्वी पार पाडले.
संपूर्ण विंचूर शहरातील मुख्य रस्त्यावरुण मोठी शोभा यात्रा काढण्यात आली होती.
विंचूर येथील शाळेच्या मैदानावर मोठी जत्रा भरली होती यामधे मोठे राहट पाळने, ब्रेक डांस व विविध प्रकारचे मनोरंजन खेळ होते तसेच अनेक मिठाई चे दुकान यामधे लागले होते.
या जत्रेतील सुप्रसिद्ध विंचूर येथील जिलेबी विकत घेण्यासाठी नागरिकानी मोठी गर्दी केल्याचे चित्र झाले होते.
ह्या वर्षी नवरदेव म्हणून बारागाड्या ओढ़ण्याचा मच्छिंद्र किसन खांदोडे यांच्या रूपाने तरुण पिढीला मिळाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक झाले. संस्कृती टिकवण्यासाठी तरुण पिढीने असाच पुढाकार घेऊन सर्वत्र सहभागी झाले पाहिजे असे मत जेष्ट जानकरांनी व्यक्त केले.
चंपाषष्ठीनिमित्त विंचूर शहरातील श्री खंडेराव महाराज मंदिरात आकर्षक रोषणाई व सजावट करण्यात आली होती.
दरम्यान, चंपाषष्ठीनिमित्त घरोघरी तळी भरण्याचा कार्यक्रम होत असल्यामुळे भरीताच्या वाग्यांचा तुटवडा निर्माण झाला होता. भरीताचे वांगे 40 ते 50 रुपये किलो दराने विकल्या गेले.
वांग्यांना आणि लाल कांद्याला मागणी
चंपाषष्ठीनिमित्त घरोघरी तळी भरण्यात येते. त्यामुळे वांगे, कांद्याची पात यांना मागणी वाढते. आज भरीताच्या वांग्यांना मागणी वाढल्यामुळे बाजार पेठेत तुटवडा जाणवला.
भरीताचे वांगे 40 ते 50 रुपये किलो तर कांद्यांची पात 20 ते 30 रुपये दराने विकली गेली.
चंपाषष्ठी निमित्त घरोघरी तळी भरुन खंडेराव महाराजांचा जयघोष केला जातो व त्यादिवसापासून चार्तुमासाची समाप्ती होते.