ग्रामपंचायत लासलगांव कडुन मिळकती तपासणी सुरु
ज्यांच्या मालमत्तेची नोंदणी ग्रामपंचायत दप्तरी नाही त्यांनी ३० नोव्हेंबर पर्यंत तात्काळ करा...
न्यायभूमी न्यूज
लासलगाव दि ०९ नोव्हेंबर
ग्रामपंचायत लासलगांव हद्दीमध्ये मोठ्याप्रमाणावर कांदा खळे, व्यापारी गाळे व नवनवीन वसाहती वाढलेल्या असुन त्यांच्या नोंदी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये करणे गरजेचे असतांनाही त्या झालेल्या नाही.
त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन अक्शनमोडवर येवुन गावातील सर्व इमारतींचे व इतर मालमत्तांचे मोजणी करुन त्यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदींनुसार कारवाई करणार असल्याची माहीती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे.
सवित्सर वृत्त असे की, ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक मालमत्ता धारकांकडुन इमारतींच्या नोंदणी ह्या पहीला मजला, मोकळा प्लॉट अशा पध्दतीने करण्यात आलेल्या आहेत.
बऱ्याच मालमत्ता धारकांनी आपल्याकडील प्रॉपर्टीची नोंदणीच ग्रामपंचायत दप्तरी केलेली नाही.
त्यामुळे ग्रामपंचायतीचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. गावात नवनवीन वसाहती मोठ्याप्रमाणावर वाढत असुन त्यांच्या नोंदणी ग्रामपंचायत दप्तरी नोंदणी करण्यात न आल्यामुळे मोठ्याप्रमाणावर शासनाचा कर बुडत आहे.
ग्रामपंचायत लासलगांव हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन बांधकामे, व्यावसायीक गाळे झालेले आहेत यापैकी बऱ्याच ईमारतींची बांधकाम करण्यासाठी ग्रामपंचायत किंवा इतर शासकीय कर्यालयाच्या परवानग्या घेण्यात आलेल्या नाहीत.
तसेच ज्यांनी परवानग्या घेतल्या आहेत त्यांनी ग्रामपंचायतीकडे ईमारत व व्यावसायीक गाळे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर पुर्णत्वाची नोंद केलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीचे उत्पन्न बुडत आहे.
ग्रामपंचायत हद्दीमध्ये परवानगी न घेता किंवा परवानगी घेवुन पुर्णत्वाची नोंद न केलेल्या मालमत्ता धारकांनी ग्रामपंचायत दप्तरी नोंदणीसाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह संपर्क करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने यापुर्वी जाहीर प्रसिध्दी देखील दिली होती.
परंतु त्यास संबंधीतांनी कोणताही दाद न दिल्याने ग्रामपंचायत प्रशासन अँक्शनमोडवर येत कर्मचाऱ्यां मार्फत गावात ग्रामपंचायतकडे कर आकारणी नसलेल्या आणि मुळ इमारतीच्या बांधकामात बदल करुन वाढीव किंवा दुसऱ्या मजल्यावर नवीन बांधकाम केलेल्या अशा सर्व प्रकारच्या इमारतींची मोजणी सुरु केली आहे.
आत्तापर्यंत १५०० शे च्या वर ईमारतींचे मोजमाप करण्यात आले असुन त्यामध्ये सुमारे १५० च्या वर इमारतींची, व्यापारी गाळे, कांदा चाळी, शेड आदींच्या नोंदणी ग्रामपंचायत दप्तरी नसल्याचे आढळुन आले आहे.
याद्वारे ग्रामपंचायत प्रशासनाने ज्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तेच्या नोंदणी ग्रामपंचायत दप्तरी झालेल्या नसतील त्यांनी त्वरीत दिनांक ३०/११/२०२४ पर्यंत ग्रामपंचायतीकडे इमारतींचे दस्त सादर करुन नोंदी करुन घेणे बाबत आवाहन केले आहे.
सदरच्या नोंद न केलेस ग्रा.पं. मार्फत नियमातील तरतुदी नुसार कार्यवाही केली जाणार असुन होणारी कार्यवाही टाळणे साठी ग्रा.पं. ला सहकार्य करणेचे आव्हान केले आहे.