विंचूर महाविद्यालयात पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा या विषयाची कार्यशाळा संपन्न
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचुर (निफाड) दि १९ डिसेंबर दत्तात्रय दरेकर
18.12.2024 रोजी रयत शिक्षण संस्थेचे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विंचूर येथे “कर्मवीर करिअर क्लब” अंतर्गत पर्यावरण व जलसुरक्षा या विषयाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
सदर कार्यशाळेत प्रमुख व्याख्याते म्हणून ‘पर्यावरण शिक्षण व जल सुरक्षा’ या विषयाचे अहिल्यानगर जिल्हा तज्ञ मार्गदर्शक व प्रशिक्षक प्रा. मा. श्री. अमोल संजयकुमार चंदनशिवे उपस्थित होते. ते सध्या कोपरगाव येथील एस. एस. जी. एम. महाविद्यालय, कोपरगांव येथे पर्यावरण विषयासाठी कार्यरत आहेत.
या कार्यशाळेत प्राध्यापक चंदनशिवे यांनी विद्यार्थ्यांसमोर मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. मनोगतातून आपले विचार मांडताना ते म्हणाले, इ. ११वी व इ.१२ वी या वर्गांसाठी ‘पर्यावरण शिक्षण व जल सुरक्षा’ हा विषय अनिवार्य असूनही तो गांभीर्याने घेतला जात नाही.
परंतु आपल्याला आपले व आपल्या देशाचे भविष्य चांगले घडवायचे असेल तर पर्यावरण संवर्धन करण्याची महत्त्वाची जबाबदारी युवकांसोबत आपल्या सर्वांचीच आहे यातूनच खऱ्या अर्थाने ग्रामीण व शहरी भाग विकासाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करेल.
लोकसहभागातून व शासनाच्या सहकार्याने पर्यावरणाचा समतोल राखून युवकांनी पर्यावरण वाचवणे व ते वृद्धिंगत करणे गरजेचे आहे.
मार्गदर्शना सोबत त्यांनी पर्यावरण विषयाचे महत्त्व व पर्यावरण क्षेत्रातील करिअरच्या संधी यांचीही विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. सध्याच्या काळात मानव स्वतःच्या स्वार्थासाठी पर्यावरणाचा वेगवेगळ्या पद्धतीने कसा ऱ्हास करत आहे, हेही अनेक उदाहरणांच्या आधारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यशाळेच्या या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री देवढे एन. ई. यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबतच या कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून लाभलेले ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. श्री. टिळेकर आर.टी. यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
यासोबत श्री. महाडदेव बी.के., श्री. पवार टी. ए. श्रीम. अहिरे सी. व्ही व श्रीम. गंधे एस. व्ही., जुनिअर कॉलेजचे सर्व सहकारी शिक्षक बंधू – भगिनी आणि विद्यार्थी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय महाविद्यालयाचे शिक्षक प्रा. श्री शिंदे एस. डी. यांनी करून दिला.
आभार प्रदर्शन समुपदेशक श्री. बी. एम. बैरागी यांनी मानले. कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिंदे एस.डी. यांनी केले.