विंचूर येथे अबॅकसच्या राज्य पातळीवरील विद्यार्थ्यांचा गुणगौरव
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि ०४ डिसेंबर: सुनिल क्षिरसागर
विंचूर येथे श्री स्वामी समर्थ अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना अबॅकस या राष्ट्रस्तरीय, राज्यस्तरीय, जिल्हा स्तरावरील निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा विंचूर येथील वेदांत हाँटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता.या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
आय जिनिअस तर्फे सप्टेंबर २०२४ मध्ये आयोजित राष्ट्रस्तरीय, राज्यस्तरीय, जिल्हा स्तरावरील परीक्षेमध्ये श्री.स्वामी समर्थ अकॅडमी,विंचूरचे एकूण ४२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी २४ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून त्यांची राज्यस्तरीय अबॅकस परीक्षेसाठी निवड झाली.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकुमारजी देवढे सर, राजेंद्रजी चांदे सर, निफाड येथील आय जीनियस अकॅडमीच्या संचालिका नीता पवार मॅडम, हेड ऑफ आयजीनियस एक्झाम डिपार्टमेंटचे दत्ता सूर्यवंशी सर, निफाड येथील होरायझन अकॅडमीच्या प्राचार्या स्नेहल सोनवणे मॅडम ,पत्रकार सुनिल क्षिरसागर, मच्छिंद्र साळुंके, रोहन सरोदे व इतर मान्यवरांना शाल, गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच या विद्यार्थ्यांना नीता पवार मॅडम, रोशनी पवार, चेतना पवार यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा, पुणे येथे घेण्यात आलेल्या परीक्षेत आयुष कांतीलाल नागरे या विद्यार्थ्याला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा पुरस्कार मिळाला.
तसेच नाशिक जिल्हा येथे झालेल्या परीक्षेत पहिला क्रमांकचे विनर सोहम वाघ, अभय कड, स्मित साळी यांनी मिळवला. दुसरा क्रमांकाचे विनर काव्या फड, हेतांश सांगळे, रेवती गायकवाड, श्रमण ठाकूर यांनी मिळवला. तिसऱ्या क्रमांकाचे विनर विराज नागरे, श्रावणी खांदोडे, समृद्धी थोरात. तर याच बरोबर बाकी विद्यार्थी वेदांत सानप, सिद्धी नागरे, ईश्वरी गायकवाड, ज्ञानवी खांदोडे, तनिष्ठा झडप,श्रावणी नागरे, आराध्या नागरे, तनुष्का खांदोडे, सात्विक जोशी, आरोही सोनवणे, अर्चित काळे, श्रावणी वाकचौरे, साहिल कडाळे, आयुष गगड या विद्यार्थ्यांचे राज्य पातळीवर निवड झालेली आहे.
अशाप्रकारे वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांनी सन्मानित केले.
कार्यक्रमाचे आयोजन सचिन कामडी व मोनाली कामडी यांनी केले तर सूत्रसंचालन सुनिल ठाकूर सर व कस्तुरी नागरे यांनी केले.