लासलगाव महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
लासलगाव दि २० विशेष प्रतिनिधी निशिकांत पानसरे
नूतन विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या लासलगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
याप्रसंगी व्यासपीठावर पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार, रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी श्री.सुनिल गायकर, श्री.देवेंद्र भांडे, श्री.प्रभाकर गांगुर्डे, श्री.मोहन बागल, श्री.रामसिंग वळवी, श्री.दत्तात्रय गायकवाड, श्रीमती लता तडवी, श्रीमती अश्विनी पवार, श्रीमती जयश्री पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मनोगतात शेलार सर म्हणाले “देव दगडात नसून माणसात आहे” असे सांगणारे संत गाडगे महाराज यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेच्या नायनाटासाठी त्यांनी आपले जीवन खर्ची घातले.
अनाथ, अपंगांचे सेवेकरी म्हणून थोर संत गाडगेबाबा यांची ओळख सांगता येईल. संत गाडगेबाबा अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते.
माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यातील पैशातून अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा,अनाथालय, आश्रम, शाळा सुरू केल्या. अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला.
यावेळी उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी श्री.देवेंद्र भांडे यांनी कले तर सूत्रसंचालन श्री.सुनिल गायकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी श्री.देवेंद्र भांडे, श्री.सुनिल गायकर आणि रासेयो स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.