डुबेरे येथील जनता विद्यालयात संत गाडगेबाबा यांना अभिवादन
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
सिन्नर दि २० डिसेंबर प्रतिनिधी –
डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संत गाडगेबाबा यांना अभिवादन करून पुण्यतिथी साजरा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास वाजे होते. व्यासपीठावर सोमनाथ पगार, विद्या ठाकरे, सोमनाथ गिरी, डी. ए.रबडे ,रेखा खंडिझोड, पोलीसपाटील रामदास वारुंगसे,सीमा गोसावी ,वरिष्ठ लिपिक राणी शिंदे,रोहिणी भगत आदी उपस्थित होते.
उपस्थितांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास वाजे यांनी गाडगेबाबा यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांनी स्वच्छता, प्रामाणिकपणा,दीन-दुबळ्यांची सेवा,माणुसकी या गुणाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या शरीराच्या स्वच्छते बरोबर आपला परिसर,घर, शाळा इत्यादी घटकांच्या स्वच्छतेकडे लक्ष दयावे.माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे.
दुर्बल घटकांना मदतीचा हात देणे हीच खरी ईश्वर सेवा आहे मुख्याध्यापक वाजे म्हणाले. सूत्रसंचालन सोमनाथ गिरी यांनी केले तर आभार दिंगबर जाधव यांनी मानले.
यावेळी मारुती डगळे, एस.बी.गुरुळे, राजेंद्र गांगुर्डे,कल्पना शिंदे,जयश्री गोहाड,श्रीमती व्ही. टी. देवरे,वृषाली घुमरे,सोमनाथ माळी,रवि गोजरे,किशोर शिंदे, निवृत्ती बर्गे ,संकेत जाधव, ऋषिकेश कुंदे आदींसह शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.