न्यायभूमी न्यूज
देवगाव -दि ०१ डिसेंबर प्रतिनिधी अजिज काद्री
देवगाव शिवाराच्या पूर्व भागात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असून.मागील सप्ताहापासून तीन-चार दुचाकी चालकांवर आणि शेतकऱ्यांवर प्राण घातक हल्ले बिबट्याने केले आहे.
निवडणुकीची धांदळ चालू असल्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांना लेखी तोंडी सांगूनही कोणीही दखल घेतलेली नाही.
निवडणूक धांदळ संपली आहे आता तरी वन विभागाने पिंजरे लावून बिबट्यांना पकडण्यात यावे,या मागणीने जोर धरला आहे.
देवगाव च्या पूर्व भागात देवगाव फाटा,मानकर वस्ती,ओतुरकर वस्ती, फिरस्ती माता परिसर, निकम वस्ती, शिंदे वस्ती आधी ठिकाणी बिबट्याचे संध्याकाळ पासून दर्शन होते.
या परिसरात दोन-तीन बिबट्या असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वाकद शिवारात शिंदे नाल्याजवळ रात्रीचे वेळी घरी जात असताना वाल्मीक गवळी या ग्रामस्थांवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. परिसरामध्ये बिबट्याची चांगली दहशत झाली.
वस्त्यांवरील शेतकऱ्यांना आपल्या लहान मुलांना शाळेत सोडण्यासाठी व घेण्यासाठी सोबत जावे लागत आहे, तर रात्रीच्या वेळी बिबट्याने वासरांवर हल्ले केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या गुरे वासरांच्या संरक्षणासाठी जाळी बांधलेली असून वासरांच्या संरक्षणासाठी रात्री दोन-तीन वेळेस फटाक्याचा आवाज करावा लागत आहे.
बिबट्याने वस्त्यांवरचे कुत्रे संपवलेले आहे.
परिसरात बिबट्याची चांगली दहशत निर्माण झाली असल्यामुळे वन विभागाने पुढील अनर्थ टाळण्यासाठी दोन-तीन ठिकाणी पिंजरे लावून बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.