न्यायभूमी न्यूज
सिन्नर दि २९ प्रतिनिधी(सोमनाथ गिरी):-
मविप्र समाज संस्थेच्या जनता माध्य. आणि उच्च माध्य. विद्यालयातील १८ विद्यार्थी व मुख्याध्यापक श्री आर.व्ही वाजे, उपक्रमशील विज्ञान शिक्षक पी.आर. करपे, श्रीम. बी.जी. निखाडे बेंगलोरच्या इस्त्रो संस्थेला भेट दिली.
गेल्या 32 वर्षापासून इस्रो मध्ये विविध मोहिमेवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञा श्रीम. आर. उमावती यांनी विद्यार्थ्यांना इस्रोमध्ये सॅटॅलाइट कशाप्रकारे तयार करतात व सोडतात.
तसेच चांद्रयान -१, चांद्रयान-२, चांद्रयान-3 याविषयी सविस्तर माहिती दिली. चांद्रयान- ३ चे चंद्रावर उतरण्याची एक व्हिडिओ क्लिप दाखविली. तसेच त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची उपकरणे वापरली आहेत आणि ती कशासाठी वापरलीत त्यांचे उपयोग सांगितले.
तसेच गगनयान हे अवकाश यात्रींना लवकरच अवकाशामध्ये घेऊन जाणार असल्याची माहिती दिली. गगनयान यशस्वी झाल्यानंतर भारत काही दिवसातच अवकाशामध्ये आपले स्वतःचे अवकाश स्थानक तयार करणार आहे.
यावेळी विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांना अनेक प्रश्न विचारले. त्यामध्ये प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणारे एखाद्या यान तयार करता येईल काय? अणूमध्ये असलेल्या कक्षेतील अंतर किती असते? गगनयान यशस्वी करण्यासाठी किती शास्त्रज्ञ यामध्ये काम करतात?
इस्रो या संस्थेत काम करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले.
त्यानंतर ज्या ठिकाणी सॅटेलाइट व चांद्रयान यांची बांधणी केली जाते त्या ठिकाणी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना निरीक्षण करण्याची संधी मिळाली. वरील सर्व बाबी पाहता विद्यार्थी आणि विज्ञान शिक्षक अतिशय मग्न होऊन गेले होते. असे वाटत होते की इस्रो हा परिसर पाहतच राहावा.
इस्रो या संस्थेला भेट देणारी नाशिक जिल्ह्यातील ही पहिली शाळा असल्याने हा उपक्रम राबविण्यासाठी विद्यालयाचा माजी विद्यार्थी श्री संदेश वाजे यांनी वैज्ञानिक सहल प्रायोजित केली होती.
यासाठी मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, संचालक श्री कृष्णाजी भगत यांच्या प्रेरणेने व संस्थेचे शिक्षण अधिकारी डॉ. भास्कर ढोके यांच्या मार्गदर्शनाने ही वैज्ञानिक सहल यशस्वी झाली.
यासाठी शालेय समितीचे अध्यक्ष नारायण वाजे, विठ्ठल वामने, भगवान वाजे, शंकर वामने, अरुण वांरूगसे, विजय वाजे यांनी प्रयत्न केले.