विंचूर मधील तरुणावर धारधार शस्त्राने हल्ला पूर्व वैमण्यास्यातून घडला हा भयानक प्रकार
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

न्यायभूमी न्यूज
विंचूर दि १६ ऑक्टोंबर
विंचूर येथील गणेश चौकात घडली आहे ही घटना पूर्व वैमनस्यातून एका युवकावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना नवरात्र उत्सव दांडिया खेळताना ही घटना घडली असून, जखमी युवकावर नाशिक येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
जखमी युवकाच्या फिर्याती7वरून चौघांवर लासलगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि.१२ ऑक्टोंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास गणेश चौक येथे नवरात्रीनिमित्त दांडिया रास सुरू होता.
यावेळी मागील कुरापत काढून सचिन चेवले, पप्पू चेवले, राज चेवले, विनायक चेवले आणि सार्थक वाघवकर, श्रावण वाघवकर यांच्यात हाणामारी झाली. यावेळी श्रावण यास मारहाण केल्याचा जाब विचारला सार्थक गेला असता सचिन चेवले यानी सार्थक वाघवकर यास बटनाच्या चाकूने वार करून जखमी केले.
सार्थक वाघवकर गंभीर जखमी झाल्याने, त्यास नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
सार्थक ने दिलेल्या फिर्यादी वरून सचिन चवले, राज चेवले, पप्पू चवले, विनायक चेवले यांच्याविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता क १०९, ११५, (२), ३५२, ३५१(२) ३५१(३), ३(५) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आप्पासाहेब हंडाळ पोलीस हवालदार अरुण डोंगरे तपास करीत आहे.