शिर्डी येथील दुहेरी हत्या कांडातील दोन्ही आरोपी अटक
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा व शिर्डी पोलीस स्टेशन यांची संयुक्त कामगिरी
न्यायभूमी न्यूज
शिर्डी दि ०६ फेब्रुवारी अभय पाटील
3 फेबुवारी पहाटेच्या सुमारास साईबाबा संस्थान शिर्डी येथे डयुटीस जात असलेले सुभाष साहेबराव घोडे वय 45 वर्षे, करडोबानगर, शिर्डी यांना करडोबानगर चौफुली येथे व नितीन कृष्णा शेजुळ वय 44 वर्षे, साई पार्क अपार्टमेंट, साकुरी शिव या ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमांनी लुटमार करण्याचे उद्देशाने अडवुन कोणत्या तरी हत्याराने भोसकुन व मारहाण करुन जिवे ठार मारले.
तसेच कृष्णा बाबाराव दहेरकर वय 68 वर्षे, श्रीकृष्णनगर, नांदुर्खी रोड, शिर्डी, यांना दोन अज्ञात इसमांनी येवुन त्यांचे मोटारसायकलला लाथ मारुन खाली पाडुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने चाकुने पोटात भोसकुन व उजवे कानावर तसेच उजव्या हाताचे मनगटावर वार करुन त्यांचे खिशातील पैसे व मोबाईल हिसकावुन घेवुन पळुन गेले होते.
याबाबत शिर्डी पोलीस ठाणे गुन्हे दाखल झाले होते.
शिर्डी येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस अधिक्षक राकेश ओला,श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे ,उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी घटनास्थळी भेट देऊन, स्थानिक गुन्हे शाखा व शिर्डी पोलीस स्टेशन यांनी शोधा शोध घेऊन किरण ज्ञानदेव सदाफुले , शाक्या अशोक माळी अटक केली असून सदरचे गुन्हे लुटमार करण्याचे उद्देशाने केली असल्याची कबुली दिली आहे.
