गोरगरीबांची दिवाळी आनंदात साजरी करण्यासाठी स्तुत्य उपक्रम; शंतनू पाटील यांच्या सामाजिक कार्याचे परिसरातून कौतुक
दत्ताजी पाटील यांचा समाजसेवेचा वारसा पाटील बंधूंकडून समर्थपणे पुढे!
न्यायभूमी
लासलगाव दिनांक १२ नोव्हेंबर विशेष वृत्त
लोकनेते दत्ताजी पाटील यांनी समाजसेवेचा जो आदर्श निर्माण केला, तो वारसा नानासाहेब पाटील आणि संजय पाटील यांनी समर्थपणे जपला आहे. त्याच विचारांचा वारसा पुढे नेत शंतनू पाटील हेही सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत.

लोकनेते दत्ताजी पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला दिवाळी मिठाई उपक्रम हा समाजातील गोरगरीब व गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा स्तुत्य प्रयत्न आहे. स्वतःच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याबरोबरच समाजातील वंचित घटकांचाही सण आनंदात जावा, ही भावना या उपक्रमातून दिसून येते.
पाटील बंधूंनी ठरविले असते तर सणासुदीचा काळ आपल्या कुटुंबासोबत घालविता आला असता; मात्र समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत त्यांनी सामाजिक कार्याला प्राधान्य दिले.
हीच लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या विचारांची खरी परंपरा असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीशी उभे राहणे ही समाजाची जबाबदारी आहे. सामाजिक उपक्रमांवर टीका करण्यापूर्वी संबंधित कार्याचे स्वरूप आणि समाजासाठी दिलेले योगदान तपासणे आवश्यक आहे.
मतभेद असतील तर ते विधायक आणि तथ्याधारित पद्धतीने मांडावेत; वैयक्तिक टीका किंवा अपप्रचारातून समाजहिताच्या कार्यात अडथळे निर्माण होऊ नयेत.
लासलगाव व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने पाटील बंधूंच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे मनःपूर्वक अभिनंदन! लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या समाजसेवेचा वारसा असाच पुढे चालत राहो आणि गोरगरीबांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे उपक्रम निरंतर सुरू राहोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!




