वीर जवान,तुझे सलाम विठ्ठलवाडी (विंचूर) गावचे भूमिपुत्र शहीद सदाशिव अशोक म्हसकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
कोटमगाव दि ०५ डिसेंबर
प्रतिनिधी श्री.ज्ञानेश्वर भवर
सैन्य दलातील शहीद जवान सदाशिव अशोक म्हस्कर यांच्या पार्थिवावर विठ्ठलवाडी येथे बुधवार दि.4/12/2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शासकीय इत्तमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आकाश म्हसकर यांनी पार्थिवाला अग्नी डांग दिला.यावेळी भारतीय सैन्य दलाच्या जवानाने सलामी देऊन मानवंदना दिली.
विठ्ठलवाडी विंचूर येथील सदाशिव अशोक म्हसकर वय 27 हे जम्मू काश्मीर येथे 118 मराठा बटालियन मध्ये लेह येथे सैन्य दलात कार्यरत होते ते सुट्टी घेऊन आले असताना मित्रांसोबत उज्जैन येथे देव दर्शनासाठी गेले होते.
उज्जैन येथून परत असताना धुळे येथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
धुळ्यात उपचार दरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली त्यांचे पार्थिव रुग्णवाहिकेतून विंचूर येथे आणण्यात आले. विंचूर येथे सैन्य दलाच्या रथातून सजवून विठ्ठलवाडी येथे त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले.
या दरम्यान कर्मवीर भाऊराव पाटील शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करून त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.
शहीद जवान सदाशिव म्हसकर यांचे पार्थिव घरी येताच त्यांची पत्नी निता सदाशिव म्हसकर आई वडील ताराबाई अशोक म्हसकर भाऊ प्रवीण अशोक म्हसकर मुलगी सानवी सदाशिव म्हसकर बहीण सविता प्रशांत जाधव चुलते सोमनाथ देवराम म्हसकर यांनी हंबरडा फोडला.
जवान सदाशिव मस्कर यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसागर उसळला होता.
सैन्याच्या सजलेल्या रथातून सदाशिव यांच्या राहत्या घरापासून स्मशान भूमी पर्यंत शोभ यात्रा काढण्यात आली.
अमर रहे, अमर रहे सदाशिव भाऊ अमर रहे जब तक सूरज चांद रहेगा सदाशिव तेरा नाम अमर रहेगा अशा घोषणा देऊन भारत मातेच्या वीर पुत्रासारख्याचा निरोप देण्यात आला.
सैन्य जवान सदाशिव म्हसकर जालना जिल्हा सैनिक कार्यालय अधिकारी जोगेश्वर कोहळे ११८ मराठा बटालियनचे हवालदार विक्रम पाटील निफाड चे तहसीलदार विशाल नाईकवाडे लासलगाव पोलीस स्टेशनचे स. पो. निरी. भास्कर शिंदे पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनर आप्पासाहेब हंडाळा विंचूर ग्रामपंचायतचे सरपंच श्री सचिन दरेकर माजी पंचायत समिती सभापती श्री.शिवा आप्पा सुराशे पंचक्रोशीतील ग्रामस्थ विठ्ठलवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.