Breaking
महाराष्ट्र

लासलगांवकर सावधान..नायलॉन मांजा वापरणार तर १०००/- पर्यंत होणार दंडात्मक कारवाई

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 1 5 5 6 0

न्यायभूमी न्यूज 

लासलगाव दि २० डिसेंबर वार्ताहार बाबा गिते 

नवीन वर्षातील पहिला आनंदाचा सण म्हणजे मकार संक्रांत. हा सण दिवसभर पतंग उडवुन तर रात्री तिळगुळ वाटुन साजरा करत असतात. पतंग उडवितांना अनेक जणांकडुन नायलॉन मांजा वापरला जातो.

त्यामुळे अनेक नागरीकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. तसेच उंच झाडांवर मांज्यामध्ये पक्षी अडकल्याने मृत्युमृखी पडले तर काही जखमी झाल्याचे यापुर्वी अनेक घटना घडलेल्या आहेत.

त्यामुळे आपण आनंदोत्सव साजरा करत असतांना इतरांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यात येवु नये.

यासाठी ग्रामपंचायत प्रशासन अँक्शन मोडवर आलेले आहे. जर ग्रामपंचायत हद्दीमध्ये कुणा नायलॉन मांजा विक्री करतांना आढळुन आल्यास आणि वापर करतांना आढळुन आल्यास १०००/- पर्यंतची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

यावर्षी कोणत्याही नागरीकांला किंवा पशु-पक्षांना नायलॉन मांज्यामुळे जखमी किंवा मृत्युमृखी पडण्याची वेळ येवु नये यासाठी ग्रामपंचायत लासलगांवने गावामध्ये दवंडी आणि सोशल मिडीयावर मेसेज पाठवुन नायलॉन मांजावर बंदी असल्याचे कळविले आहे.

जर ग्रामपंचायत हद्दीमध्ये कुणी नायलॉन मांज्याची विक्री आथवा पतंग उडविण्यासाठी वापर केल्यास १०००/- पर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

तसेच एकदा दंड झाल्यावर पुन्हा नायलॉन मांज्याची विक्री अथवा वापर करतांना आढळुन आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची जाहीर सुचना देण्यात आलेली आहे.

ग्रामपंचायतीने दिलेल्या संदेशामध्ये लासलगांव हद्दीमधील सर्व नागरीकांना आणि व्यावसायिकांना कळविण्यात आलेले आहे की, ग्रामपंचायत लासलगांवने शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये सहभाग घेतलेला असल्याने पर्यावरणाचे व पशु-पक्षांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे.

शासन निर्णायानुसार नायलॉन मांजा व तत्सम मांजा वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे गावी नवीन वर्षामध्ये येणाऱ्या सणांचे निमित्ताने साजरा करण्यात येणाऱ्या पतंग महोत्सवासाठी नायलॉन मांजाची विक्री आणि वापर कुणीही करु नये.

आपल्या परिसरामध्ये कोणी व्यावसायीक नायलॉन मांजा विक्री करत असल्यास त्याची माहीती तात्काळ ग्रामपंचायत कार्यालयास कळविण्यात यावे असा संदेश नागरीकांना पाठविण्यात आलेला आहे.

नायलॉन मांजाचा वापर केल्याने अनेक नागरीकांना आमि पशु पक्षांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. त्यामुळे आपण आनंद साजरा करत असतांना इतर कुणाला ईजा होणार नाही, कुणाचा जीव जाणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

आपल्या कृत्यामुळे दुसऱ्यांच्या घरात दुःख साजरा करण्याची वेळ येणार नाही यासाठी नागरीकांनी स्वतःहुन नायलॉन मांजाचा वापर टाळावा. एल.जे.जंगम, ग्रामपंचायत अधिकारी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 5 6 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे