कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, विंचूर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन!
Nyaybhumi news
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि ०७ डिसेंबर संपादक दत्तात्रय दरेकर
विंचूर येथील दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी विद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर व इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र क्रांती करून पळता भुई थोडी करणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमासाठी कर्मवीर भाऊराव पाटील माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य देवढे एन ई यांनी अध्यक्ष पद भूषविले. सदर कार्यक्रम हा इ.9ई च्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या घडवून आणला.
कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष व इतर मान्यवर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
कार्यक्रमामध्ये खालील विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याविषयी आपले विचार व्यक्त केले.
दिव्या मघाडे, समृद्धी मुद्गुल, मयुरी मुद्गुल, स्वप्नाली कडलग, वैभवी उगले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री.देवढे सर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान व राज्यघटना निर्मितीमध्ये दिलेले योगदान तसेच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ईश्वरी शेळके व वैभवी गुंजाळ ह्या विद्यार्थिनीने केले व कार्यक्रमाचे आभार कल्याणी मुद्गुल हिने व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक .जोपळे के जी,रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर चांदे आर के,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष राजू गोरे, साळुंखे ए एन, पवार एस एम, निकम एम एस विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.