Breaking
कृषीवार्ता

नासिक पूर्व भागाला अवकाळी पावसाने झोडपले

Nyaybhumi news

0 1 5 5 7 6

न्यायभूमी न्यूज 

येवला दि ०६ डिसेंबर प्रतिनिधी एकनाथ भालेराव 

नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागाला शुक्रवारी सायंकाळी एक वाजता जोराच्या पावसाने प्रचंड झोडपले.

यामुळे रब्बी पिकांना लाभ होणार असला तरी, काढणीला आलेला कांदा पीकास फटका बसणार आहे.

 

गेल्या अनेक दिवसांपासून ढगाळ हवामान असून थंडीही गायब झाली आहे. तसेच नाशिक जिल्हा परिसरात शुक्रवारी अनेक ठिकाणी रात्रीच्या एक वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली.

यात येवला,लासलगाव विंचूर,निफाड या बहुतांशी भागात पावसाने हजेरी लावून तारांबळ उडवली

 

गेल्या अनेक दिवसांपासून ढगाळ हवामान आणि पावसाचे वातावरण तयार झाले होते.

दुपारच्या तीव्र उष्म्यानंतर सायंकाळी एक वाजेच्या सुमारास नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. पावसाने पाणी साचले. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात पिके वेगवेगळ्या टप्प्यात आहेत.

 

नाशिक जिल्ह्यात पिकांचे नुकसान

पावसाने रब्बी हंगामातील कांदा रोप, कांदा पिके , गहू ,हरबरा ,द्राक्ष आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

लाल कांदा व इतर पिकांच मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबाबत सरकारने लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 5 7 6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे