न्यायभूमी न्यूज
कोटमगाव दि १५ ऑक्टोंबर प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर
सविस्तर वृत्त असे की, गेल्या काही दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे निफाड तालुक्यातील वनसगाव, उगाव, सारोळा ,खडक माळेगाव ,टाकळी ,कोटमगाव, वेळापूर ,आंबेगाव ,लासलगाव, विंचूर , थेटाळे विठ्ठलवाडी या गावांमध्ये हाती आलेले पिकांचेअतोनात नुकसान झाले आहे मका सोयाबीन ,खरीप कांदा, कांदा बियाणे (उळे) द्राक्ष पिकांची नुकसान झाले त्याचबरोबर कांद्याचे बियाणे खराब झाले आहे.
महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे व तातडीने आर्थिक मदत द्यावी.
अशी मागणी होत आहे शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे अतोनात नुकसान होत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
निफाड तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या या संकटाच्या वेळी कधी धावून येणार.
शेतकऱ्यांच्या अश्रू पूसतील का असा प्रश्न शेतकरी वर्ग करत आहे. तरी महसूल व कृषी विभागाने तातडीने बैठक घेऊन त्वरित पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. अशी मागणी होत आहे.