शासकीय क्रीडा स्पर्धेत विंचूर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विभागीय पातळीवर निवड
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि ११ दत्तात्रय दरेकर
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील पुढील विद्यार्थ्यांनी शासकीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये यश मिळवून त्यांची विभागीय पातळीवर निवड झाली आहे.
यशोदीप बाळकृष्ण व्यवहारे जलतरण स्पर्धेत 100 मीटर बेस्ट स्ट्रोक प्रकारात प्रथम क्रमांक, साक्षी योगेश दरेकर 400 मीटर हर्डल्स क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक, यश परशराम दरेकर गोळा फेक क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
त्याबद्दल विद्यालयात सदर विद्यार्थ्यांचा प्राचार्य देवढे एन. ई. यांच्या हस्ते सत्कार केला गेला.
सदर कार्यक्रमास विद्यालयाचे पर्यवेक्षक जोपळे के. जी. , संस्थेचे लाईफ मेंबर चांदे आर. के., ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख टिळेकर आर. टी., निकम एस. व्ही., अहिरे सी. व्ही., बैरागी बी. एम., पवार टी. ए. सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
तसेच रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथजी शिंदे, जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजितजी गुंजाळ, उत्तर विभागीय सल्लागार मंडळाचे सदस्य सुनील शेठ मालपाणी, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ दरेकर, उपाध्यक्ष कैलास शेठ सोनवणे, जगदीश जेऊघाले, अनिल दरेकर, गंगाधर जेऊघाले, पालक शिक्षक संघ सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य, माता पालक शिक्षक संघ सर्व सदस्य, गुरुकुल पालक शिक्षक संघ सदस्य, यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.