नूतन विद्यालय खडक माळेगाव येथे आंतर- शालेय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
खडक माळेगांव दि १५ डिसेबर विशेष प्रतिनिधी
खडक माळेगाव -येथील नूतन विद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. दिनांक 11 डिसेंबर रोजी विद्यालयाच्या प्रांगणात एकूण 93 विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रतिकृती बनवून त्यांची उपयोगिता सादर केली.
निसर्गाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन कसा उपयोगी पडेल. टाकाऊ पासून टिकाऊ निर्मिती कशी करता येईल.
आपत्ती व्यवस्थापन, निसर्ग संवर्धन, नैसर्गिक ऊर्जा स्रोतांचा काटेकोर उपयोग, आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी विज्ञान मॉडेल बनवून आपला वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवला.
विद्यालयाच्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संचालक श्री दत्ता काका रायते, श्री संजय भास्करराव शिंदे, विद्यालयाच्या पालक- शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री सूर्यभान रायते , उगाव विद्यालयाचे उपशिक्षक श्री वाबळे सर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ रायते मंजुषा आदींच्या हस्ते करण्यात आले.या विज्ञान प्रतिकृतींचे निरीक्षण, पर्यवेक्षण उगाव विद्यालयाचे उपशिक्षक श्री वाबळे सर, नूतन विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ शिंदे मॅडम, श्री बगाटे भूषण आदींनी केले.
पाचवी ते सातवीच्या लहान गटात कुमारी पल्लवी सायकर तर आठवी ते दहावी या मोठ्या गटात कुमार गोवर्धन रायते यांची तालुका स्तरावरील विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली.
रांगोळी स्पर्धेत अक्षदा शाम रायते ही विजेती ठरली. विज्ञान प्रदर्शनासाठी प्रतिकृती बनवण्यासाठी मार्गदर्शन विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्री भोसले जे आय, श्री कदम आर पी यांनी केले. विद्यालयाचे सर्व उपशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
नूतन विद्यालय खडक माळेगाव येथे आंतर- शालेय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न.
खडक माळेगाव -येथील नूतन विद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. दिनांक 11 डिसेंबर रोजी विद्यालयाच्या प्रांगणात एकूण 93 विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रतिकृती बनवून त्यांची उपयोगिता सादर केली.
निसर्गाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन कसा उपयोगी पडेल. टाकाऊ पासून टिकाऊ निर्मिती कशी करता येईल.
आपत्ती व्यवस्थापन, निसर्ग संवर्धन, नैसर्गिक ऊर्जा स्रोतांचा काटेकोर उपयोग, आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी विज्ञान मॉडेल बनवून आपला वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवला.
विद्यालयाच्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संचालक श्री दत्ता काका रायते, श्री संजय भास्करराव शिंदे, विद्यालयाच्या पालक- शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री सूर्यभान रायते , उगाव विद्यालयाचे उपशिक्षक श्री वाबळे सर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ रायते मंजुषा आदींच्या हस्ते करण्यात आले.
या विज्ञान प्रतिकृतींचे निरीक्षण, पर्यवेक्षण उगाव विद्यालयाचे उपशिक्षक श्री वाबळे सर, नूतन विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ शिंदे मॅडम, श्री बगाटे भूषण आदींनी केले.
पाचवी ते सातवीच्या लहान गटात कुमारी पल्लवी सायकर तर आठवी ते दहावी या मोठ्या गटात कुमार गोवर्धन रायते यांची तालुका स्तरावरील विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली. रांगोळी स्पर्धेत अक्षदा शाम रायते ही विजेती ठरली.
विज्ञान प्रदर्शनासाठी प्रतिकृती बनवण्यासाठी मार्गदर्शन विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्री भोसले जे आय, श्री कदम आर पी यांनी केले.
विद्यालयाचे सर्व उपशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.