विंचूर जवळील विठ्ठलवाडी येथील जवान सदाशिव अशोक म्हसकर शहीद
न्यायभूमी न्यूज : सुनील क्षिरसागर
विंचूर (नाशिक) : दि ०४ डिसेंबर
विंचूर पासून जवळच असलेले विठ्ठलवाडी येथील जवान विंचूर (विठ्ठलवाडी) येथील भूमिपुत्र शहिद सदाशिव अशोक म्हसकर हे लेह (जम्मू काश्मीर) येथे कार्यरत असतांना आज अल्पशा आजाराने त्यांचे दुःखद निधन झाले.
एक शेतकरी कुटुंबातील सदस्य होते आणि विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात त्यांनी आपले शिक्षण घेतले होते.
त्यांच्या जाण्याने संपूर्ण विंचूर पंचक्रोशीत व विठ्ठलवाडी पंचक्रोशीत शोककळा पसरली असून, त्यांचा अंतिम विधी त्यांच्या गावात विठ्ठलवाडी येथे सायंकाळी होणार आहे.
यावेळी विंचूर- लासलगाव परिसरातील ग्रामस्थ, कार्यकर्ते, अधिकारी, पोलीस, पत्रकार आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या वतीने रस्त्यावरती विद्यार्थी, शिक्षकांनी त्यांना नेत असलेल्या मार्गावर उभेराहून पुष्परुष्टी शहिद जवान सदाशिव म्हसकर यांना भावपूर्ण आदराने अर्पण केली.