Breaking
महाराष्ट्र

महावितरण कंपनीच्या चांदवड विभागीय कार्यालयात लकी डिजीटल ग्राहक योजने अंतर्गत लकी ड्रा पद्धतीने निवड

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 9 5

न्यायभूमी न्यूज 

चांदवड दि १८ एप्रिल विशेष प्रतिनिधी 

महावितरण कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबई यांनी वीज ग्राहकांसाठी लकी डिजीटल ग्राहक योजना राबवलेली असून त्या अंतर्गत माहे जानेवारी २०२५ ते मार्च २०२५ या कालावधीत ऑनलाईन विज देयक भरणा करणाऱ्या वीज ग्राहकामधून लकी ड्रा पद्धतीने निवड झालेल्या ग्राहकांना माहे एप्रिल २०२५ मध्ये भेट वस्तू देवून सन्मानित करण्याचे प्रस्तावित होते.

त्या अनुषंगाने दि. १७.०४.२०२५ रोजी महावितरण कंपनीच्या चांदवड विभागीय कार्यालयात लकी डिजीटल ग्राहक योजने अंतर्गत लकी ड्रा पद्धतीने निवड झालेल्या वीज ग्राहकांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान चांदवड विभागचे कार्यकारी अभियंता माननीय श्री.केशव काळूमाळी साहेब, यांनी भूषविले.

तसेच या कार्यक्रमासाठी विभागीय कार्यालयातील अति.कार्यकारी अभियंता श्री. सुनील राहिंज, उप व्यवस्थापक श्री. राजेंद्र सावळे, या सह चांदवड उप विभागाचे उप कार्यकारी अभियंता श्री. तुषार सूर्यवंशी, लासलगाव उप विभागचे उप कार्यकारी अभियंता श्री. ज्ञानेश बागुल, पिंपळगाव उपविभागाचे उप कार्यकारी अभियंता श्री.उमेश पाटील हे अधिकारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात प्रथम बक्षीस म्हणून SAMSANG SMART PHONE A06, द्वितीय बक्षीस REDMI SMART PHONE A3X, आणि तृतीय बक्षीस म्हणून SMART WATCH FASTEACK PHNTOM आणि गुलाब फुल हे देण्यात आले. कार्यक्रमास खालील प्रमाणे लाभार्थी ग्राहक उपस्थित होते.

       सदर कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी आणि योजनेतील लाभार्थी ग्राहक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या पैकी श्री. पंकज शिरवे, लासलगाव यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि हि योजना ग्राहकांसाठी सुखद व ऑनलाईन विजभरणा करणेकरिता प्रोत्साहन वाढविणारी आहे. या पुढे आम्ही नियमितपणे ऑनलाईन विजभरणा करू तसेच आमच्या परिचितांना सुद्धा ऑनलाईन विजभरणा करणे करिता प्रेरित करू. महावितरण कंपनीने अशा प्रकारच्या योजना भविष्यात सुद्धा राबवाव्यात, ज्यांचा फायदा वीज ग्राहकांना व कंपनीला दोघांना हि होईल.

   मा.कार्यकारी अभियांता यांनी सदर योजनेचे लाभार्थी ग्राहक हे या योजनेचे BRAND AMBASSADOR असून त्यांनी इतर ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने विज देयक भरणा करण्याकरिता प्रोत्साहित करावे असे विनम्र आवाहन केले.

तसेच महावितरण कंपनी हि ग्राहकांच्या सेवे करिता सतत कटिबद्ध असून ग्राहकांकरिता कुसुम योजना आणि मागेल त्याला सोलर या शेती पंपासाठी व घरगुती वापरासाठी असलेल्या सोलर योजनेत भाग घेवून वीज बचत कशी करता येईल हे ग्राहकांपर्यंत पोहोचविणे करिता लाभार्थी ग्राहकांना मार्गदर्शन केले.   

सॅमसंग स्मार्ट फोन A06 प्रथम क्रमांक बक्षीस यादी

अ.क्र.

विभागाचे नाव 

उपविभागाचे नाव ग्राहक क्र.

ग्राहकाचे नाव 

1चांदवड विभाग 

चांदवड 059810004058

श्रीमती.रिना जनार्दन केदारे

2 चांदवड विभाग 

लासलगाव 073160007858

श्रीमती.शोभा अनिल शिंदे

3

चांदवड विभाग 

निफाड 

073013312718

श्रीमती.हिराबाई पंढरीनाथ जाधव

 

4

चांदवड विभाग 

पिंपळगाव 

073210018856

श्री.जयंतीलाल भिकचंद छाजेड

रेडमी स्मार्ट फोन A3X द्वितीय क्रमांक बक्षीस यादी 

अ.क्र.विभागाचे नाव 

उपविभागाचे नाव ग्राहक क्र.

ग्राहकाचे नाव 

1 चांदवड विभाग 

चांदवड 060290003647

श्री.अशोक बापू देवरे

2 चांदवड विभाग 

चांदवड 060450033441

श्री.रामेश्वर नरहरी वाकचौरे

3 चांदवड विभाग 

लासलगाव 073660007994

श्री.नरहरी कृष्णाजी गांगुर्डे

4 चांदवड विभाग 

लासलगाव 074280034618

श्री पंकज गुलाबराव सिर्वे

5 चांदवड विभाग 

निफाड 073244413461

श्री.अशोक शंकरराव नाईक

6 चांदवड विभाग 

निफाड 073354991800

श्री.दिलीप बाबुराव पवार

7 चांदवड विभाग 

पिंपळगाव 057010004600

श्री सुभाष पुंडलिक सोनवणे

8 चांदवड विभाग 

पिंपळगाव 057090000235

श्रीमती नर्मदाबाई रामभाऊ वडजे

स्मार्ट वॉच फास्टीक फँटम तृतीय क्रमांक बक्षीस यादी 

अ.क्र.विभागाचे नाव 

उपविभागाचे नाव ग्राहक क्र.

ग्राहकाचे नाव 

1 चांदवड विभाग 

चांदवड 059671008191

मुख्याध्यापक प्रथमिक विद्या मंदिर

2 चांदवड विभाग 

चांदवड 060130004841

श्री.अमोल अण्णा बाटव

3 चांदवड विभाग 

लासलगाव 073318026588

श्री.जगदंब रिपावरिंग मंगेश सांगळे

4 चांदवड विभाग 

लासलगाव 073860004591

श्री.कचरु कारभारी महाले

5 चांदवड विभाग 

निफाड 073010005997

श्री.मारुती जगन्नाथ कुंभारडे

6 चांदवड विभाग 

निफाड 073800003439

श्री.जगन निवृत्ती बरकले

7 चांदवड विभाग 

पिंपळगाव 073030059082

श्री.किसन परशराम पवार

8 चांदवड विभाग 

पिंपळगाव 073034105453

श्री.विजय चिंतामण कराटे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे