विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात सेवापूर्ती सोहळा संपन्न!
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर- दि २९ एप्रिल मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालय येथे पर्यवेक्षक काशिराम गंगाराम जोपळे व वरिष्ठ लेखनिक जाधव धोंडीराम वाळूबा जाधव हे रयत शिक्षण संस्थेत प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त विद्यालयात त्यांचा सेवापूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते, रयत शिक्षण संस्थेचे आराध्य दैवत कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरीनाथ दरेकर अध्यक्ष स्थानिक सल्लागार समिती हे होते.
विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी आपल्या प्रास्ताविकातून उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले व सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांचा गौरवपूर्ण कार्याचा उल्लेख करून त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
त्यानंतर जाधव परिवार व जोपळे परिवारातील सदस्यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले. विद्यालयातर्फे पर्यवेक्षक काशिराम जोपळे व लेखनिक धोंडीराम जाधव यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष कैलास सोनवणे यांनी आपल्या भाषणातून सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांना सदिच्छा दिल्या व पुढील आयुष्य समाज कार्यासाठी व्यतीत करावे.
असा आशावाद व्यक्त केला तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. सुजित गुंजाळ सदस्य जनरल बॉडी हे शिक्षण संस्था सातारा यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांनी रयत शिक्षण संस्थेत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल संस्थेच्या वतीने धन्यवाद दिले.
त्यानंतर पर्यवेक्षक काशीराम जोपळे व वरिष्ठ लेखनिक धोंडीराम जाधव यांनी आपल्या मनोगतातून रयत शिक्षण संस्था व संस्थेतील सेवा कालखंड व सेवेतील शाखांचा अनुभव याविषयी माहिती दिली.
संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. सदर कार्यक्रमासाठी अनिल दरेकर सदस्य स्थानिक स्कूल कमिटी विंचूर, पंढरीनाथ लहारे सर, पी के नाना जेऊघाले, दत्तू शिंदे ढवण सर,आहेर सर, सुनंदाताई शिंदे, उन्मेष डुंबरे वनसगाव, अशोक दरेकर, गायकवाड पाटील, चव्हाण सर,विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सुरेश वाबळे, प्राध्यापक राजेंद्र टिळेकर तसेच जोपळे परिवार व जाधव परिवारातील सदस्य, विविध शालेय समितीचे अध्यक्ष, सदस्य, पालक, ग्रामस्थ,विद्यालयातील शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चांदे आर के लाइफ मेंबर व शिक्षण संस्था सातारा, नागणे बी आर, सावळे ए वाय यांनी केले व उपस्थितांचे आभार पर्यवेक्षक सुदामराव माळी यांनी मानले.