अमिता ब्रम्हेचा यांना ‘प्रेरणा गौरव पुरस्कार’ मिळाल्याबद्दल लासलगाव ग्रामपंचायत मध्ये सत्कार समारंभ संपन्न
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
लासलगाव दि.१४ ऑक्टोंबर / बाबा गिते
गिरणा गौरव प्रतिष्ठान व महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘प्रेरणा गौरव पुरस्कार’ यंदा निफाड तालुक्यातील लासलगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य आणि जैन संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा अमिता ब्रम्हेचा यांना प्रदान करण्यात आला.
यानिमित्ताने आज दि.१३ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायतीच्या प्रांगणात स्नेहपूर्ण सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या वेळी सरपंच योगिता पाटील यांच्या हस्ते अमिता ब्रम्हेचा यांचा शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

अमिता ब्रम्हेचा यांनी सामाजिक,धार्मिक व महिला सक्षमीकरण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिला गेला. कार्यक्रमात उपस्थित सर्व ग्रामपंचायती सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी चंद्रशेखर होळकर यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच,ग्रामपंचायत उपसरपंच रामनाथ शेजवळ, सदस्य चंद्रशेखर होळकर,अफजल शेख,रोहित पाटील,अमोल थोरे,अश्विनी बर्डे,ज्योती निकम, पुष्पा अहिरे प्रतिष्ठीत नागरीक योगेश पाटील, सचिन (पिंटु) शिकलकर, गणेश निकम, ग्रामपंचायत अधिकारी संजय बावीस्कर आणि कर्मचारी उपस्थित होते.




