Breaking
आरोग्य व शिक्षण

लासलगाव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरळीत सुरू

1 2 3 9 5 1

न्यायभूमी

लासलगाव दिनांक ०१ ऑक्टोंबर २०२६ कैलास उपाध्ये 

 लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवासाची गैरसोय लक्षात घेऊन लासलगाव–सोमठाणदेश–निळखेडे–पाटोदा–येवला मार्गावर नियमित बससेवा सुरू करण्याची मागणी विद्यार्थी, पालक व महाविद्यालयाच्या परिवहन समितीच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत संबंधित बस आगार प्रशासनाने १ सप्टेंबरपासून बससेवा सुरळीत सुरू करण्याचे आश्वासन दिले.

               महाविद्यालयात परिसरातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. नियमित बससेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून महाविद्यालय प्रशासन, विद्यार्थी व पालक यांच्या वतीने संबंधित बस आगार प्रमुखांकडे निवेदन देऊन लासलगाव–सोमठाणदेश–निळखेडे–पाटोदा–येवला मार्गावर नियमित बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

              सदर निवेदन स्वीकारल्यानंतर आगार प्रशासनाने विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी १ ऑक्टोबर पासून नियमित बससेवा सुरू करण्याची हमी दिली. त्यानुसार आज विद्यार्थ्यांना वेळेवर बस आल्याने संबंधित मार्गावरील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात वेळेवर येणे-जाणे सुलभ झाले असून त्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

               बससेवा सुरळीत सुरू करण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन लगेच बस सुरू केल्याबद्दल विद्यार्थी, पालक तसेच महाविद्यालय प्रशासनाने समाधान व्यक्त केले असून विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 2 3 9 5 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे