चांदवड तालुक्यात कातरवाडी येथील विहिरीत आढळले बिबट्याचे पिल्लू; वनविभागाची तात्काळ धाव
न्यायभूमी संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
नासिक दि ३० डिसेंबर मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

चांदवड तालुक्यातील कातरवाडी (ता.चांदवड, जि.नाशिक) येथे दिनांक 29 /12/ 2025 रोजी चांदवड तालुक्यात कातरवाडी येथील विहिरीत आढळले बिबट्याचे पिल्लू; वनविभागाची तात्काळ धाव घेतली असून सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास एक थरारक घटना घडली.
कातरवाडी येथील शेतकरी गोकुळ कुशिनाथ झाल्टे हे आपल्या गट क्रमांक २५१/१,विसापूर चौफुली जवळील शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता बिबट्याचे पिल्लू विहिरीत पडलेले असल्याचे आढळून आले.
ही बाब लक्षात येताच गोकुळ झाल्टे यांनी कोणताही विलंब न करता आपले वर्ग मित्र वन्य पशु प्राणी मित्र भागवत झाल्टे यांना तात्काळ माहिती दिली.
त्यानंतर सदर घटनेची माहिती वनपरिक्षेत्र येवला येथील वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) राहुल घुगे यांना कळविण्यात आली.माहिती मिळताच RFO राहुल घुगे यांनी त्वरित वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पाठवले.
घटनास्थळी वनविभागाकडून RFO राहुल घुगे, वनरक्षक सोनाली वाघ, वनमजूर अंकुश गुंजाळ व विश्वनाथ झाल्टे दाखल झाले.
तसेच गावकऱ्यांमधून मंगेश झाल्टे,अनिल झाल्टे, भारत झाल्टे,कार्तिक झाल्टे,बबन झाल्टे यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेत बिबट्याच्या पिल्लाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रेस्क्यूची तयारी सुरू केली. परिसरात बिबट मादी असण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले.
या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.मात्र,वनविभागाने वेळेवर दाखल होऊन परिस्थिती हाताळल्यामुळे मोठा अनर्थ टळला. नागरिकांनीही संयम राखत वनविभागाला सहकार्य केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
वन्यप्राणी व मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी अशा घटनांची तात्काळ माहिती देणे आवश्यक असल्याचे वनविभागाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
निफाड येथून रेस्क्यू टीम दाखल झाली त्यावेळी अंकुश गुंड,विजय माळी,सादिक शेख,भारत माळी,सागर दुशिंग, शरद चांदोरे, वैभव दौंड, मयूर गागुर्डे,ज्ञानेश्वर पवार,काशिनाथ माळी, सादिक शेख यांनी मोठ्या शर्तीच्या प्रयत्नाने बिबट्याच्या पिल्लाला सुरक्षितपणे बाहेर काढून आपल्या ताब्यात घेतले व उपचारासाठी निफाड येथे रवाना करण्यात आले.
त्यावेळी कातरवाडी ग्रामस्थांची अशी मागणी होती की रात्रीच्या वेळेस लाईट न देता विद्युत मंडळाने दिवसा लाईट देण्यात यावे आणि उपस्थित प्राणी मित्र भागवत झाल्टे यांनी बिबट मादी परिसरात असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळेस सावधान राहावे स्वतःची परिवाराची व जनावरांची काळजी घ्यावी.



