एस एन डी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
येवला दि १९ फेब्रुवारी पुष्पा पाटील
सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील एस एन डी इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल बाभूळगाव तालुका येवला या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.
वार्षिक स्नेहसंमेलन साठी भारत देशाचा प्रवास या संकल्पनेचा विचार करण्यात आला होता.याप्रसंगी इयत्ता नर्सरी ते इयत्ता नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भारत देशातील विविध राज्यांचा संस्कृती प्रदेशात करणारे नृत्य सादर केले.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित जन्मोत्सव व अफजलखानाचा वध हा देखावा देखील सादर करण्यात आला होता. तसेच स्त्रीशक्ती सक्षम व्हावी हा संदेश देणारा लाठीकाठीचा थरारक कृतीयुक्त देखावा या ठिकाणी सादर झाला. त्याचप्रमाणे आरोग्य व मन यांचा योग्य मेल साधण्यासाठी योगा किती आवश्यक आहे हे स्पष्ट करणारा योगाचे विविध नाट्यमय प्रकार पालकांच्या समोर यावेळी सादर केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी येवला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री कुसाळकर संजय सर, प्रमुख अतिथी म्हणून जगदंबा एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री रुपेश भाऊ दराडे तसेच एसएसएम ही जुनियर कॉलेजचे प्राचार्य श्री येवले सर, बीड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मोरे सर, सीबीएसई स्कूलच्या प्राचार्या श्रीमती पटेल, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य श्री नागराज सर, कृषी कॉलेजचे प्राचार्य श्री कुळधर सर, तसेच शाळेचे पालक प्रतिनिधी, बाभुळगाव चे सरपंच श्री वाबळे सर, पालक प्रतिनिधी व माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरुवात श्री गणेश मूर्ती व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती पूजन झाली. कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन श्रीमती शेळके साक्षी, कुमारी वैष्णवी, कुमारी कशिष, व हमजा शेख यांनी केले.
यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यानंतर शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्याचप्रमाणे विविध खेळातील क्रीडा विभागातील विविध स्तरावरील पारितोषिक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आला.
त्याचप्रमाणे शाळेला विविध उपक्रमांमध्ये मिळालेले बक्षीस यांचे व शैक्षणिक प्रगतीचे वाचन शाळेचे प्राचार्य यांनी मुख्याध्यापकाचा अहवाल या माध्यमातून सादर केला. यानंतर गटशिक्षणाधिकारी श्री कुसाळकर साहेब यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी विद्यार्थी तसेच भरभरून अभ्यास करावा ज्याचा फायदा भविष्यात भरभरून मिळाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन करत यम्मा यम्मा हे खूबसूरत समा बस आज की रात हे जिंदगी कल हम कहा तुम कहा हे गीत विद्यार्थ्यांसाठी सादर केले. त्याचप्रमाणे श्री येवले सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षकांचा आदर केल्यास ज्ञानाचा तुटवडा पडणार नाही हे स्पष्ट केले व भविष्यातील विविध संधीच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर प्रमुख कार्यक्रमास सुरुवात झाली प्रथम नृत्य श्री गणेश वंदना सादर झाले.
यानंतर प्रत्येक राज्याची संस्कृती प्रदेशात करणारे एकूण 28 गाण्यांचे नृत्य पालकांसमोर सादर झाले. त्याचप्रमाणे क्रीडा शिक्षक श्री मुटेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली योगाचे विविध प्रकार गाण्यावर पालकांसमोर सादर झाले. मन आणि शरीर याचा योग्य समतोल साधावायचा असल्यास योगा किती महत्त्वाचा आणि सोपा आहे हे या माध्यमातून पालकांसमोर सादर झाले. तसेच विशेष आकर्षण ठरले ते छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मोत्सव व अफजलखानाचा वध ज्यांनी पालकांचे मनमोहन घेतले.
सदर नाटकेसाठी पालकांकडून वन्स मोर मिळाला. अशाप्रकारे एस एन डी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात व आनंदात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे पर्यवेक्षक व सर्व शिक्षक पालक यांच्या उपस्थितीत वंदे मातरम व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले.
यानंतर उप मुख्याध्यापक श्री संदीप पाटील यांनी आभार प्रदर्शन सादर करत माननीय गटशिक्षणाधिकारी, संस्थेचे संचालक, उपस्थित पालक, शिक्षक यांचे धन्यवाद व्यक्त केले.

