Breaking
महाराष्ट्र

लासलगाव येथे कुणाल दराडे फाउंडेशन वतीने पत्रकारांचा सन्मान

https://www.instagram.com/reel/Dfba-wvtKL-/?rpxt=NjRvMGphMHZjOGFv

1 3 3 8 8 3

न्यायभूमी 

लासलगाव दिनांक ०७ नोव्हेंबर कैलास उपाध्ये 

सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांतील घडामोडी जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करीत असतात समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

याच भावनेतून लासलगाव येथे कुणाल दराडे यांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता लासलगाव येथील हॉटेल अगत्य येथे हा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी उपस्थित पत्रकारांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न, समस्या, विकासकामे तसेच जनसामान्यांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे

काम सातत्याने सुरू ठेवले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत कुणाल दराडे यांनी पत्रकारांचा गौरव केला.

https://www.instagram.com/reel/Dfba-wvtKL-/?rpxt=NjRvMGphMHZjOGFv

या कार्यक्रमात
पत्रकार महेश साळुंखे, किरण आवारे ,कैलास उपाध्ये, बाबा गीते, शरद लोहकरे, अनिल भावसार, रवींद्र जाधव, जगदाळे यांना भेटवस्तू व मिठाई देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकारांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक करण्यात आले. पत्रकारिता हे केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून समाजातील सामान्य माणसाचा
आवाज बनण्याचे प्रभावी साधन आहे.

समाजातील चांगल्या कामांना प्रसिद्धी देतानाच अन्याय अत्याचार आणि नागरिकांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्याची जबाबदारी पत्रकार पार पाडत असतात.

अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या पत्रकारांचा सन्मान हा त्यांच्या लेखणीचा आणि समाजाप्रती असलेल्या योगदानाचा सन्मान असल्याची भावना या उपक्रमातून व्यक्त झाली.

 

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 3 8 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे