न्यायभूमी न्यूज
मुंबई दि ०४ मार्च
मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून सर्वच स्तरातून मागणी होत आहे.
त्यातच आमदार धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपद काढून घेण्याची देखील मागणी करण्यात येत होती आणि आता त्यांचे मंत्रिपद काढण्यात आले असून त्यावर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.
“बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व.संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी,ही माझी पहिल्या दिवसापासून ची ठाम मागणी आहे.
काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे.
तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे.”