शासकीय क्रीडा स्पर्धेत विंचूर महाविद्यालयाचे उत्कृष्ट प्रदर्शन
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील मुख्य सपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
विचूर दि.०३ ऑक्टोंबर दत्तात्रय दरेकर
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने तालुकास्तरीय शासकीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले.
समीक्षा संधान(धावणे),वीर जाधव (तिहेरी उडी) व मोहित नेवगे (हातोडा फेक) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
प्रतीक चव्हाण, समीर माळी (हर्डल्स), वैशाली निकम, साक्षी भालके (गोळा फेक),पायल वैराळ,नीलम ढमाण (भालाफेक) यांनी द्वितीय क्रमांक पटकावीत त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली.
रोहित गुजर,ओम घायाळ,कामिनी बर्डे,तनिष्का सानप,ओमकार निकम (धावणे),सैफ मोमीन, मंगेश जाधव,नीलिमा माळी (उंचउडी),ऋषिकेश गुजर (भालाफेक),कृष्णा निकम(हर्डल्स), संदीप वाघ (हातोडा फेक) दिशा निकम,आदित्य पाडवी (लांबउडी) यांनी तृतीय क्रमांकासह यश मिळवले.
सदर विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख टिळेकर आर. टी.बैरागी बी.एम.खोंडे एन.सी.अहिरे सी.व्ही., पाडवी सर,वसावे मॅडम व इतर शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे,जनरल बॉडी सदस्य डॉ.सुजित गुंजाळ, उत्तर विभागीय सल्लागार समिती सदस्य सुनील मालपाणी,सल्लागार समितीचे अध्यक्ष जगदीशकाका जेऊघाले,उपाध्यक्ष कैलास सोनवणे, पंढरीनाथ दरेकर,अनिल दरेकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजाभाऊ गोरे, उपाध्यक्ष सोमनाथ निकम,ज्ञानेश्वर गाडे, आबासाहेब दरेकर,शाळा व्यवस्थापन व सल्लागार समिती,शिक्षक पालक,माता पालक संघ, पत्रकार संघ, सर्व पदाधिकारी व सदस्य, प्राचार्य देवढे एन.ई.उपमुख्याध्यापक वाबळे एस. एम.पर्यवेक्षक माळी एस.टी.लाइफ मेंबर चांदे आर.के.व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.