Breaking
कृषीवार्ता

नवीन वर्षात बळीराजावर जप्ती व लिलावाची टांगती तलवार, 56 हजार थकीत कर्जदार शेतकरी कारवाईच्या विळख्यात

सरसकट कर्जमाफी साठी उग्र आंदोलन उभारणार,  कर्जमुक्ती अभियान येवला बैठकीत निर्धार 

0 1 6 8 5 6

न्यायभूमी न्यूज 

येवला – दिनांक २३ डिसेंबर प्रतिनिधी एकनाथ भालेराव 

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची 2024 अखेर 56 हजार 797 शेतकऱ्यांकडे 993 कोटी एवढी मुद्दल थकबाकी असून, त्यावरील व्याज वेगळे आहे.

निवडणूकीचे वर्ष संपताच जिल्हा बँक धडक कारवाई करून जमीन जप्ती व लिलाव करण्याच्या तयारीत आहे.

जिल्हा बँकेने व विविध कार्यकारी सहकारी संस्थेने सहकार कायद्यान्वये आतापर्यंत कलम 101 अन्वये 28 हजार 445 लोकांच्या कारवाई केली आहे.

सहकार कलम कायदा 100 व अन्वये 775 शेतकऱ्यांच्या जमिनी या आधीच जप्त केल्या 15 337 शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करण्याची कारवाई सुरू कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.

नव्या वर्षात पहिल्याच आठवड्यात 113 खातेदारांच्या जमिनी जमिनी जप्त करून त्यांची लिलाव करण्यात येणार आहे.

या विषयावर व्यापक जनजागृती करण्यासाठी भारम येथे चिंता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या कारवाई विरोधात तीव्र आंदोलन उभे करण्यात येणार आहे. थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हान शेतकरी कर्जमुक्ती अभियानाचे येवला तालुका संयोजक भागवतराव सोनवणे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने नाशिक येथे जून 2023 पासून धरणे आंदोलन सुरू आहे,

लोकसभा, विधानसभा निवडणुक काळात थंडावलेली कारवाई आता मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.

 हजारो शेतकऱ्यांवर भूमीहीन होण्याची वेळ येणार आहे,बरेच शेतकरी सुस्तावस्थेत असून सरकार आपोआप मदत करेल अशा भाबड्या आशेत आहेत.

मात्र शेतकऱ्यांनी उठाव केल्याशिवाय जिल्हा बँक कारवाई थांबवणार नाही, बँक जमीन विक्री करून शेतकरी भूमीहीन होऊ शकतात, शेत जमिनीचा ताबा बळाचा वापर करून घेतला जाऊ शकतो याबाबत शेतकरी गंभीर नाही.

 

ज्यावर उपजीविका आहे अशी शेत जमीन शेतकऱ्यांच्या हातून निसटू शकते आता पुढे येऊन मोठे आंदोलन उभारण्याची गरज आहे जिल्हा सहकारी बँकेने संस्थात्मक कर्ज असणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या आहेत शेतकऱ्यांच्या म्हणवल्या जाणाऱ्या आता शेत जमिनीवर जप्ती व विक्रीची कारवाई सुरू केली आहे.

उग्र आंदोलनाशिवाय पर्याय नाही असे यावेळी दृकश्राव्य मार्गदर्शन करताना शेतकरी समन्व्यय समितीचे संयोजक भगवान बोराडे म्हणाले,

यावेळी अशोक आव्हाड भीमराज आवारे, शामराव सोमासे, भाऊसाहेब आहेर, समाधान सोमोसे, नाना बोंबले,छबु सोमसे, गोरख गायकवाड, कैलास पवार श्रावण देवरे ज्ञानेश्वर नरोडे रवींद्र सोमासे, साहेबराव सोमासे आदिसह शेतकरी उपस्थित होते…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 6 8 5 6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे