सकल मराठा परीवार व परनॉड रिकार्ड इंडिया प्रा. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आधारतीर्थ आश्रमात अन्नधान्य वाटप
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
नाशिक दि ०५ जानेवारी
सकल मराठा परीवार व परनॉड रिकार्ड इंडिया प्रा. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आधारतीर्थ आश्रम,अशोक स्तंभ या ठिकाणी सामजिक दायित्व या भावनेतून अनाथ मुलांसाठी अन्नधान्य ( बाजरी,सोयाबीन,पोहे, डाळीचे पीठ, तेल डब्बा,तूरडाळ, मसूर डाळ,तूप,तांदूळ, शेंगदाणे आदी धान्य) देण्यात आले.
परनॉड रिकॉर्ड कंपनीचे नेहमीच सामजिक कामात सहभाग असतो कंपनीच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातात.
शाळेतील मुलांना उपयोगी साहित्य वाटप असेल, समाजातील गरजू साठी आरोग्य सेवा,गरीब मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती असे अनेक समाजहिताचे उपक्रम करते.
या प्रसंगी परनॉड रिकॉर्ड कंपनीचे नियती पटेल, कविता भारंबे,जस्मिन शहा , वैष्णवी पाटील पाटील,राजू कांबळे, अमोल गाढे,शिवाजी नाठे सकल मराठा परिवार चे चैताली आहेर,खंडू आहेर, आनंद पाटील, योगेश वरखडे, प्रवीण देशमुख, संजय काळे, संजय गोरडे उपस्थित होते.