विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ‘वाचन संकल्प
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
येवला दि ०३ जानेवारी पुष्पा पाटील
विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.
या अनुषंगाने ग्रंथप्रदर्शन, सामूहिक वाचन, कथाकथन, ग्रंथपरिक्षण, निबंध लेखन, लेखक आपल्या भेटीला असे विविध उपक्रम घेण्यात आले.
आज दिनांक १ जानेवारी रोजी ग्रंथालयाद्वारे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. दिनेश यादव यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनास मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी भेट दिली, तसेच सामूहिक वाचन ही घेण्यात आले, यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
वाचन कार्यशाळेत ग्रंथपाल प्रा. जे. पी. नागरे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व सांगितले ते म्हणाले वाचन हे जगण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. अविचाराने जगल्यामुळे विविध प्रश्न निर्माण होऊ शकतात, म्हणून विवेक जागा करण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे.
विद्यार्थी जीवनात अधिकाधिक वाचन केल्यास भावी आयुष्य सुसंपन्न होऊ शकेल. वर्तमानात माहिती क्रांतीचा स्फोट झाला असून त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे.
मात्र आजकाल वाचनाकडे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होत असून त्याचा परिणाम त्यांच्या वर्तमानावर होत आहे.
सोशल मीडियाच्या प्रेमात तो अधिक पडला आहे. पुस्तकाच्या प्रेमात त्याने पडले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. अन्सारी, डॉ. रोकडे, डॉ. पवार, डॉ. निकम, डॉ. राणे, प्रा.दंडगव्हाळ, प्रा. डाके यांनी सहकार्य केले.