के.के.वाघ इंग्लिश स्कूल रानवड येथे गणित प्रदर्शन उत्साहात संपन्न
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
कोटमगाव दि २३ डिसेंबर ज्ञानेश्वर भवर
के. के. इंग्लिश स्कूल काकासाहेबनगर येथे २१ डिसेंबर, शगणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून इयत्ता १ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी गणितातील विविध प्रतिकृती सादर केल्यात.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी के. के. वाघ शिक्षण संस्थेचे जनसंपर्क संचालक माननीय श्री. अजिंक्य दादा वाघ, श्री. रामनाथ पानगव्हाणे व पालकवर्ग उपस्थित होते.
या प्रसंगी ज्ञानसागर अकॅडमी पिंपळगाव (ब.) चे संचालक श्री.भाऊसाहेब कुशारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मुख्याध्यापक श्री. शरद कदम हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. आपल्या मनोगतात श्री. कुशारे सर यांनी गणित तज्ञ् रामानुजन यांचा जीवनप्रवास सांगितला, तसेच आधुनिक काळात गणिताचे मानवी जीवनातील महत्व स्पष्ट केले. मुख्याध्यापक शरद कदम यांनी गणित विषयाचे अभ्यासक्रमातील स्थान व महत्त्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले.
या प्रदर्शनात ३२३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. श्रावणी जाधव, आदिती वाघ, सृष्टी शिंदे, श्रुती शिंदे, यांनी आपली मनोगते व्यक्त करत गणिताच्या दैनंदिन जीवनातील अनेक उपाययोजना विषद केल्या.
कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून शादाब शेख, अर्चना मोकळ, पूनम अष्टेकर, पल्लवी कोल्हे व मृणाली कुशारे यांनी काम पहिले. अर्चना मोकळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
पूनम अष्टेकर व पल्लवी कोल्हे यांनी सूत्रसंचालन केले तर मयूर दौंड यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे आभार मानले.