न्यायभूमी न्यूज
रानवड : दि.२६ प्रतिनिधी / प्रसाद वाघ
ओझर येथील ‘मविप्र’ संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयात स्काऊट गाईड आनंद मेळा संपन्न झाला. प्रारंभी लॉर्ड बेडन पावेल यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.
शिक्षक बाबासाहेब लभडे यांनी स्काऊट गाईड आनंद मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मविप्रचे उपसभापती डी बी मोगल होते.
व्यासपीठावर मविप्र संचालक शिवाजी गडाख महिला संचालिका शोभा बोरस्ते शालेय समितीचे अध्यक्ष भास्करराव शिंदे खंडेराव मालसाने वसंत गवळी निवृत्ती शेटे कचेश्वर मोरे लक्ष्मण चौधरी प्रकाश पाटील मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापिका सुनीता नलावडे उपस्थित होते.
स्काऊट गाईड मेळाव्याचे उद्घाटन उपसभापती डी बी मोगल संचालक शिवाजी गडाख महिला संचालिका शोभाताई बोरस्ते यांच्या हस्ते हायड्रोजन फुगे हवेत सोडून झाले. ‘कमवा व शिका’ अंतर्गत पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी ५३ स्टॉल लावले होते.
खाद्यपदार्थात गुलाबजाम वडापाव भजी मिसळ पाववडा इडली सांबार उपमा डोसा शिरा कांदापोहे ढोकळा आप्पे समोसा भेळ चहा पाणीपुरी चिवडा आदी खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांनी स्वतः बनविले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वहात होता.अध्यक्षीय भाषणात डी बी मोगल यांनी, जीवनात स्व कष्टातून केलेली कमाई इतरांना आनंद व प्रेरणा देणारी असते असे गौरवोद्गार काढले. फलक रेखाटन कलाशिक्षिका मोनाली निकम मोहन क्षीरसागर यांनी केले.
स्काऊट मेळा यशस्वीतेसाठी समिती प्रमुख शिक्षिका मेघा शेजवळ भाऊसाहेब रौंदळ बाबासाहेब लभडे बाबासाहेब गायकवाड रेखा देशमाने मंगल सावंत योजना खैरनार सरोज खालकर सीमा पाटील अशोक हळदे संजय काठे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शिक्षक बाबासाहेब लभडे यांनी केले.