Breaking
आरोग्य व शिक्षण

बाभूळगाव येथील एस एन डी अभियांत्रिकी महाविध्यालयात सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव साजरा

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

येवला दि ०३ जानेवारी पुष्पा पाटील 

बाभूळगाव येथील एस एन डी अभियांत्रिकी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी सावित्रीबाई च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच महिला प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला.

आयोजित कार्यक्रमात कर्मज्योती सावित्रीबाई चा जीवन परिचय व सामाजिक कार्याविषयी माहिती देण्यात आली. 

 यावेळी इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ प्रकाश रोकडे यांनी सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला.

प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ विद्या निकम सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक योगदान, सामाजिक क्रांतीतील महत्त्व आ आजच्या संदर्भातील उपयुक्तता सांगितली तसेच स्त्रीसक्षमीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांवर सखोल व्याख्यान दिले.

 संगणक विभागप्रमुख डॉ समीक्षा बोंबले म्हणाल्या कि सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी असा कार्यक्रम प्रेरणादायी आहेत.

प्राचार्य डॉ. डी . एम यादव म्हणाले कि सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या स्त्री शिक्षणासाठी दिलेल्या लढ्यामुळे भारतातील मुली मुक्तपणे शिक्षण घेत आहेत यावेळी स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. यु. एस. अन्सारी , एमबीए विभागप्रमुख पी एम दांडघव्हाळ शैक्षणिक अधिष्ठाता प्रा संदीप येवले इलेकट्रॉनिक्स आणि कॉम्पुटर विभागप्रमुख प्रा गणेश ढाके व प्राध्यापक उपस्थित होते आभार प्रा सचिन सावंत यांनी मांडले.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे